पुणेकरांनो सावधान! ओमिक्रोन पुण्यात आल्याची शक्यता.

दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळते. पण त्याच नागरिकाच्या घरातील व्यक्तींचे रिपोर्ट निगेटिव आले आहेत. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकास ओमिक्रोन झाला आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी करावी लागेल असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे बाधितच्या जीनोम सिक्वेन्सिंग रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ओमिक्रोन या नवीन प्रकारामुळे जगभर खळबळ उडाली आहे. हा कोरोना चा एक घातक प्रकार असल्याचे WHO संस्थेकडून सांगण्यात आले. साऊथ आफ्रिका आणि बोटस्वाना या दोन देशांमध्ये गेल्या काही दिवसात कोरोनाचा एक नवीन प्रकार दिसून आला आहे.भारतासाठी चिंताजनक बाब म्हणजे भारत आणि साऊथ आफ्रिका या देशांमधील प्रवास सुरू होते. आणि ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले दक्षिण आफ्रिकेतून पुण्यात आलेल्या एका नागरिकाची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह निघाली.

याच सोबत भारत आणि न्युझीलँड दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सामन्यात 25% लोकांची उपस्थिती असावी असे महाराष्ट्र सरकारने बीसीसीआयला सांगितले आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे भारताची TEAM A साऊथ आफ्रिकेमध्ये आहे.आणि वाढत्या कोरोना केसेस मुळे भारत व साऊथ आफ्रिका दौरा रद्द होण्याच्या मार्गावर.

  • हे नक्की वाचा :

ओमिक्रोन नक्की काय आहे ? WHO ची भारताला चेतावणी

Leave a Comment