१० वि नंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स वाचाच

१० वि नंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स वाचाच :


१० वी १२ वि म्हणजे turning point. दहावी आणि बारावी चे वर्ष म्हणजे विद्यार्थी आणि पालक दोन्हीची परीक्षा असल्यासारखेच. यावेळी मिलणारे मार्क्स म्हणजे तुमच्या वाटचालीची दिशा ठरवतात. आलं लागल्यानंतरही हेय ओझे हलके होते नाही. दहावी नंतर निर्णय घेणे खूपच कठीण बनते. आपल्याला कोणत्या शाखेत जायचे हेय ठरवववे लागते ।कितीही जास्त किंवा कमी ऊन असतील तरी कुठे तरी विज्ञान शाखेला प्रवेश मिळतो का यासाठी प्रयत्न केले जातात. खूप प्रयत्न करूनही जर इथे प्रवेश मिळाला तर मग वाणिज्य म्हणजे कॉमर्स चा विचार केला जातो. इथं हि खूप प्रयत्न करून फायदा झाला नाही तर मग कला शाखेचा पर्याय स्वीकारावा लागेल.

१० वि नंतर करिअर निवडताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी या महत्वपूर्ण टिप्स वाचाच

एकदा या पायरीवर चिकीची निवड झाली कि कॅरिरमधील महत्वाची वर्षे वाया जाण्याची शक्यता असते. धुनिक पालकांची इच्छा असते कि आपल्या पाल्याने विज्ञान निवडावी. यानंतर डॉक्टर इंजिनेर , असे प्रतिष्टीत समजले जाणारे मार्ग निवडता येतात. दहावी बारावी विज्ञान शाखेतून केले नि तुम्हाला वाटले कि या शाखेतून करिअर करायला नको तरीही फारसे काही अडत नाही. बारावीनंतर तुम्हाला वाणिज्य आणि कला शाखा निवडण्याचा पर्याय खुला हे. याउलट वाणिज्य नि कला शाखेत मुभा नसते.
बरेचदा पालकांचा आग्रह असतो कि विज्ञानच शाखा निवडावी. विद्यार्थी सुद्धा.

safe side म्हणून असा विचार करतात. हि शाखा जरा कठीण मानली जाते. आवड नसतानाही ती निवडून जर तुम्हाला तो अभ्यासक्रम जमलं नाही तर वर्ष वाया जाण्याची शक्यता असते. शिवाय बारावी नंतर पुन्हा वेगळी शाखा घ्यायची म्हणजे अभ्यासक्रमात होणार बदल आअप्लयला स्वीकारता येणार आहे का याचाही विचार व्हायला हवा. हा सगळं गोंधळ वाढवण्यापेक्षा आपल्याला ज्यात रस आहे ते निवडणे कधीही उत्तमच.

वाणिज्य :

वाणिज्य शाखेत आर्थिक व्यवहारांशी निगडित संपूर्ण अभ्यासक्रम असतो. काटेकोरपणा आणि अचूकता ला खूप महत्व आहे. म्हणून विज्ञान आहि मिळाले तर वाणिज्य निवडू असा विचार करणे चुकीचे आहे. या हेखेसाठी लागणारी कौशल्य विद्यार्थात आहे का आणि यानंतर ज्या प्रकारची नोकरी असेल त करणे त्याला जमणार आहे का याचाही विचार करायला हवा.

कला :

काहीच पर्याय नाही म्हणून नाइलाज समजल्या या शाखेतील सर्व पर्यायांची फारशी माहितीच घेतली जात नाही. खरतर कला शाखेतून सुद्धा खूप मार्ग निवडता येतात.
समाजशात्र , मानसशास्त्र , राज्यशस्त्र , इतिहास आणि असे अनेक विषयात याद्वारे आपल्याला पदवी घेता येते. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर या उत्तम पर्याय आहे. शिवाय शाखेनंतर पुढे अनिमेशन , अभिनय किंवा इतर कुठल्याही क्रीटीव्ह क्षेत्रात पदवी घेऊन असंख्य मार्ग उपलब्ध होतात.

डिप्लोमा कोर्सेस :

अकरावी बारावी चे शिक्षण न घेता या कोर्से चा पर्यायही निवडता येतो. डिप्लोमा नंतर तुम्ही ज्या विषयात डिप्लोमा केला त्याच्या पदवीलाही प्रवेश घेता येतो. पण डिप्लोमा करण्यासाठी तुम्हाला नक्की कष्ट करिअर करायचे आहे हेय नक्की माहित असावे लागते. कारण एकदा कि हा मार्ग निवडला कि तुम्हाला पर्याय नसतो. त्याच विषयात पुढील शिक्षण घेणे बंधनकारक असते. याच फायदा असा होतो कि तुमची दिशा नक्की असेल तर इतर विषयांचा अभ्यास न करता तुम्हाला फक्त आवडीच्या विषयाचा अभ्यास करण्याची संधी मिळते.

१ आवड आणि इच्छा :

तुम्ही जी दिशा निवडता त्यात तुम्हाला पुढील आयुष्यभर काम करायचे असते. त्यामुळे त्यातून किती पैसे कमवता येऊ शकतो एवढाच विचार न करता आपण हेय काम एवढ्या मोठ्या कालावधीसाठी करू शकू का ? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. आपल्याला आवडणाऱ्या विषयात काम करण्याचा सहसा कंटाळा येत नाही. म्हणून आवडीच्या विषयातच करिअर करण्याचा निर्णय घेणे कधीही फायद्याचे ठरते. शिवाय आवड असल्याने त्यात प्रगती करणेही अवघड वाटत नाही.

२ व्यक्तीमत्वाचा अभ्यास :

जर आपण स्वतःच्या व्यक्तिमत्वाला जाणून घेतले तर करिअर निवडणे अधिक सोपे होते. कारण ने आपण कुठे कुमकुवत आहेत कुठे कमी पडतो हेय कळते व त्यावर अधिक लक्ष देता येते. आपल्यात काय कौशल्य आहेत याचीही जाणीव होते. मग अश्या प्रकारच्या व्यक्तिमत्वाला कोणता अभ्यासक्रम आणि कसे करिअर अधिक उत्तम ठरेल याचा अंदाज करणे इतकेसे कठीण नसते.

3 अनुभवी लोकांशी चर्चा :

ज्या विषयात आपल्याला रस आहे त्यात पूर्वी करिअर केलेल्या लोकांशी चर्चा करणे खूप फायद्याचे ठरते. तुम्हाला यशस्वी होण्यासाठी नक्की काय करायला हवे याची कल्पना येते. पालक , शिक्षक , मोठे बहीण भाऊ यांनाही तुम्ही तुमच्या शंका विचारू शकता. आतून उत्तरे आणि नवनवीन माहितीत मिळते. या लोकांना तुमच्या बद्दल अशा उष्टी माहिती असतात ज्याची तुम्हालाही कल्पना नसते. त्यामुळे ते अशा गोष्टींची जाणीव देऊन विविध पर्याय सुचवू शकतात.

४ करिअर कोन्सेलर :

जेव्हा बराच विचार करूनही नक्की काय करावे सुचत नाही तेव्हा करिअर कोन्सलोर कडे जाणे हा उत्तम पर्याय आहे किंवा तुम्हाला तुमच्याबद्दल अधिक जाणून घ्याचे असेल तरीही हा पर्याय आहे. कारण कोन्सलर अशा काही चाचण्या घेतात ज्याने तुमचा कल कोणत्या क्षेत्राकडे आहे हेय कळते. तुमचे व्यक्तिमत्व कोणत्या प्रकारचे करिअर साठी योग्य आहे हेय हि त्यातून कळते. त्यांना सगळ्या शाखांबद्दल आणि संधीबद्दल ज्ञान असते. ते तुमची मोठी मदत करू शकतात.

५ निर्णयक्षमता :

तुमच्या भविष्याचा निर्णय घेण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. कोण काय मार्ग निवडतोय याचाही विचार करू नका. स्वतःच्या भविष्याचा निर्णय घेण्याची जबाबदारी स्वतः घ्या. त्यासाठी हवे तेवढे प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हाला काय करायचे हा निर्णय स्वतःच्या हातात ठेवा .

हे नक्की वाचा:

Leave a Comment