डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाषण, निबंध: Babasaheb Ambedkar Bhashan Marathi
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. रामजी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करत असत. मुलांना ते चांगली पुस्तके वाचायला आणून देत असत. बाबासाहेबांना म्हणून वाचनाची आणि अभ्यासपूर्ण चिंतनाची सवय त्यांच्या ठायी आढळते. त्यांचे व्यक्तिमत्त्व अस्थतपैलु होते . प्रत्येक क्षेत्राचे परिपूर्ण ज्ञान व माहिती होती. सामाजिक राजकीय आर्थिक धार्मिक पत्रकारिता कायदे अशा क्षेत्रात कुशल नेतृत्वाने आंबेडकर यांनी दिन दलितांच्या श्रमिकांच्या विस्थपितांच्या शोषितांच्या अंधकारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेरक , उध्दरक व तारक शक्ती होय. त्यांनी मनुष्य मात्रांच्या जीवनातील दुःख दारिद्य्र आणि क्लेश दूर करण्यासाठी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपले पुरे ज्ञान माहिती व बाळ लावले. शैक्षणिक विचार – शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी शास्त्र आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. जो पिल तो माणूस गुरगुरल्या शिवाय राहणार नाही , असे ते समज बांधवांना सांगत. प्राथमिक शिक्षणाचे ध्याय असे असले पाहिजे कि , मुलगा किंवा मुलगी एकदा शाळेत दाखल झाले कि ते पूर्णपणे सुशिक्षित माहितीपूर्ण व गुणवत्ताप्राप्त करूनच बाहेर पाडावेत. शासनाने यासाठी लाक्ष द्यायला हवे समाजच्या सर्व थरापर्यंत शिक्षण गेले पाहिजे.
मुलांची मने सुसंस्कृत व गुणवत्तामय बनवावी. पेवोपल्स एडुकेशन सोसायटी स्थापना १९४६ साली करून त्यांनी मुंबई ला सिद्धार्थ कॉलेज व औरंगाबादला मिलिंद महाविद्यालय सुरु केले. राष्ट्रहित व समाजहित भान ठेवणारेच खरे शिक्षण होय. भ्स्रष्टाचार अनीती अत्याचार अन्यायास त्यांचा प्रखर विरोध होता. जातीभेद म्हणजे समाजाला लागलेली कीड असे ते समजत असत. इ कीड नष्ट केल्याशिवाय समाज एकसंघ होणार नाही. बाबासाहेब तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करून त्यांना मंत्र देणारे एक पथदर्शक होते.
स्त्रियांना पुरुषांप्रमाणे सामान हक्क मिळावेत यासाठी त्यांनी अनेक चालवली केल्या. स्त्रियांची गुलामगिरी दूर केली. १९२७ ते १९५६ पर्यंतच्या काळात भारतीय स्त्रीचा सामाजिक कायदेशीर आणि राजकीय दर्जा वाढावा म्हणून प्रयत्न केला. १९४२ साली भरलेल्या नागूपूर येथील परिषदेत त्यांनी महिलांना सांगितले स्वायत्त पाळा सर्व दुर्गुणांपासून उर दूर राहा मुलामुलींना शिक्षण द्या त्यांना महत्वकांक्षी बनवा , त्यांचा न्यूनगंड दूर करा असा उपदेश दिला.