धर्मवीर आनंद दिघे यांची संपूर्ण महिती | Dharmaveer Anand Dighe Biography

धर्मवीर आण्णा दिघे यांची संपूर्ण महिती, Dharmaveer Anna Dighe Biography

नमस्कार मित्रानो तुम्हा सर्वाचे स्वागत आहे आपल्या वेबसाइट वर या पोस्टमधे आपण पाहणार आहोत. धर्मवीर आनंद (आण्णा) दिघे यांची संपूर्ण महिती यामधे आपण पाहणार अहोत आनंद दिघे(आण्णा) यांचा राजकारणात प्रवेश ,आनंद आश्रम येथे भरवला जाणारा त्यांचा जनता दरबार, त्यांना धर्मवीर का म्हटले जाऊ लागले, आनंद दिघे यांचे निधन.

धर्मवीर आनंद दिघे यांची संपूर्ण महिती | Dharmaveer Anna Dighe Biography

राजकारणात प्रवेश

आनंद(आण्णा) चिंतामणी दिघे हे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शिवसेना पक्षाचे ठाणे जिल्हाप्रमुख होते त्यांचा जन्म 27 जानेवारी 1952 रोजी झाला. ठाण्यातला सर्वात गजबजलेला परिसर म्हणून ओळख असणाऱ्या टेंभी नाका परिसरात त्यांचे घर होते.

Dharmaveer Anand Dighe Biography

टेंभी नाका परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा भरायच्या तरुण वयात आनंद दिघे बाळासाहेब ठाकरे यांच्या सभाना उपस्थित रहायचे. बाळासाहेबांचे वकृत्व व व्यक्तिमत्व यांनी आनंद दिघे आकर्षित झाले होते. त्यामुळे त्यांनी उभ आयुष्य शिवसेनेसाठी काम करायची ठरवलं आणि सत्तरच्या दशकात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून कार्य सुरू केले.

त्यांच्या कामात इतके इतकी निष्ठा होती की त्यांनी लग्न सुद्धा केले नाही असे ठाणे वैभव या वर्तमान पत्राचे संपादक मिलिंद बल्लाळ सांगतात शिवसेनेला सुरवातीच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये सामान यांमधून पुढाकार घेणारे आणि सामान्य जनतेला आपलेसे वाटणारे तरुण नेते हवे होते ती गरज आनंद दिघे यांनी पूर्ण केली.

त्यांनी बाळासाहेबांना पासून प्रभावित होऊन शिवसेनेसाठी काम करण्याचे ठरवले ते सक्रिय राजकारणात सहभागी झाल्यानंतर एक एक पाऊल टाकत ते ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख पदापर्यंत पोहोचले अल्पावधीत ठाणे जिल्ह्यात आनंद दिघे यांची लोकप्रियता वाढली दिघे यांच्या कामाची धडाडी पाहून शिवसेनेने त्यांच्या खांद्यावर ठाणे जिल्हाप्रमुखची जबाबदारी दिली.

संपूर्ण नावआनंद(आण्णा) चिंतामणी दिघे
जन्म२७ जानेवारी १९५१
वडिलांचे नावचिंतामणी दिघे
मुलगाकेदार दिघे
कार्यठाणे जिल्हा प्रमुख (शिवसेना)
मृत्यु26 ऑगस्ट 2001 (वय 50)
ठाणे

आनंद आश्रम

आनंद दिघे यांच्यावर शिवसेनेने जिल्हा प्रमुखाची जबाबदारी दिल्यानंतर ते टेंभी नाका येथील शिवसेना कार्यालयावर राहू लागले आनंद दिघे यांनी टेंभी नाका परिसरातच आनंद आश्रमाची स्थापना केली.

या आश्रमात दररोज सकाळी जनता दरबार भरायचा या दरबारात आपल्या तक्रारी अण्णा यांना ऐकवण्यासाठी लोक सकाळी सहा वाजल्यापासून रांगा लावून उभे राहत वाट पहायचे. ठाणे शहरच नव्हे तर पूर्ण जिल्ह्यातील सामान्य लोक या आश्रमात येऊन त्यांच्या समस्या अण्णा दिघे यांना सांगत आणि त्या समस्या अण्णा तात्काळ सोडवायचे त्यांनी उडवाउडवीची उत्तरे कधी दिली नाहीत अनेकदा तक्रारी ऐकून यावर लगेच उपाय शोधत असायचे.

कधीकधी काम करून घेण्यासाठी त्यांनी रोखठोक भूमिका ही घेतल्या त्यांनी काही प्रसंगी न्याय मिळवून देण्यासाठी हिंसेचा ही वापर केला यामुळेच त्यांना रोखठोक व्यकक्तिमत्त्व म्हणून ओळखलं जाऊ लागलं त्यांचा दरारा असला तरी तो आजारी फक्त होता त्यामुळे पोलिस आणि प्रशासन सगळ्यांमध्ये त्यांचा धाक होता आनंदाश्रम न्यायालयाच्या भूमिकेत अशी टीका काम करतोय अशी टीका त्यावेळी ठाण्यातील समाजवादी मंडळींनी केली होती

धर्मवीर

अण्णा दिघे यांना देवाच्या कार्यात विशेष सूची रुची होती त्यांनीच टेम्बी नाक्यावरील नवरात्र उत्सव सुरू केला. त्यावेळेस सर्वात मोठा दहीहंडी उत्सव दिघे यांनी सुरू केला. आज या दोन्ही उत्सव सर्वांसाठी राज्यातील लोक कानाकोपऱ्यातून भेट देण्यास येतात त्यांच्या याच धार्मिक कार्यामुळे त्यांना शिवसेना प्रमुखंनी अण्णा दिघे यांना धर्मवीर अण्णा दिघे ही उपाधी दिली सामान्य माणसांमध्ये आपला नेता अशी दिघे यांची ओळख होती.

त्यामुळेच अगदी भांडणा पासून ते घरातील अनेक तक्रारी इन पर्यंत अनेक विषय दिघे यांच्या जनता दरबारात यायचे ठाण्यातील स्थानिक तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी अनेक प्रयत्न केले अनेकांना छोटे-मोठे व्यवसाय सुरू करून दिले. तर ठाणे महानगरपालिकेतील परिवहन सेवेत स्थानिकांना नोकऱ्या मिळवून देण्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.

आनंद दिघे यांची ठाण्यामधील कार्य किती मोठे होते याची आपण कल्पनाही करू शकत नाही त्यांचा ठसा इतका मजबूत होता स्थानिक प्रसारमाध्यमांत बरोबरच इंग्रजी प्रसारमाध्यमांनीही वेळोवेळी त्यांची व त्यांच्या कार्याची प्रशंसा केली.

आनंद दिघे यांचे निधन

24 ऑगस्ट 2001 कार्यकर्त्यांच्या घरी गणेश उत्सव आला निमित्त भेट देण्यासाठी दिघे निघाले याच दरम्यान ठाण्यातील वंदना टॉकीज समोर त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला यामध्ये त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले तसेच डोक्याला मार लागला त्यांना तात्काळ सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

दवाखान्यात 2६ ऑगस्ट 2001 त्यांच्या पायावर यशस्वीरीत्या शस्त्रक्रिया करण्यात आली यानंतर त्याच संध्याकाळी त्यांची तब्येत जास्त खालावली त्याच रात्री त्यांना दोन वेळा हृदयविकाराचे झटके आले डॉक्टरांनी त्यांचे प्राण वाचविण्याचे सर्व प्रयत्न केले पण रात्री अखेर १०:३० सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यानंतर रागाच्या भरात त्यांच्या पंधराशे चाहत्यांनी सिंघानिया हॉस्पिटलला आग लावली आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाणे बंद ठेवण्यात आले.

ये नक्की वाचा –

Leave a Comment