स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi: Essay on Independence Day in Marathi

स्वतंत्र दिन हा राष्ट्रीय उत्सव म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिश साम्राज्यातून स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी राष्ट्रीय स्वतंत्रयोस्तव म्हणून साजरा केला जातो.

स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi

भारतात दरवर्षी१५ ऑगस्ट रोजी आपला स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.१५ ऑगस्ट १९४७ रोजी बऱ्याच वेदना व संघर्ष नंतर इंग्रजांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले. इंग्रजांनी आपल्या देशावर जवळपास १५० वर्षे राज्य केले होते. भारत आणि पाकिस्तान या दोन देशांच्या फाळणीची तारीख देखील स्वातंत्र्य दिनाचे औचिक आहे.

Constitution Indian Flag Freedom Independence Day

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या प्रसिद्ध भाषणात भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.भारतातील ब्रिटिश राजवटीचा हा शेवट आणि मुक्त भारताची सुरवात होती.

स्वातंत्र्य दिनाची सुरुवात भारताच्या पंतप्रधानाच्या वार्षिक भाषणाने होते .ते देशाच्या कर्तुत्वाला उल्लेख करतात. आणि आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या वीर कार्याची आठवण करून देतात.भारताच्या पंतप्रधानाच्या हस्ते राष्ट्रगीत जण गण मन म्हटले जाते. राष्ट्रध्वज फडकावल्या नंतर लगेच २१ बंदुकांतून आकाशात गोळ्या झाडल्या जातात.

इथे आपल्या देशाचे वीर सैनिक काही कसरती करून दाखवितात , तसेच काही सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा सादर केले जातात. राष्ट्रीय सुट्टी असल्याने या दिवशी सर्व शैक्षणिक संस्था व कार्यालये बंद असतात. सर्व शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधीच घेण्यात येतात. नृत्य आणि गायन स्पर्धा घेतल्या जातात. संपूर्ण वातावरण देशभक्तीने भरलेलं असते. सर्व महत्वाची सरकारी कार्यालये आणि इमारती तिरंगाच्या रंगाने रंगलेल्या असतात.

स्वातंर्त्य दिनाच्या एक किंवा दोन आठवड्यांपूर्वी बाजारपेठ तिरंगी झेंड्यानी आणि पतंगांनी भरलेली असते. आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या महान स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आम्हाला आठवण येतात. महात्मा गांधी , भगतसिंग सुखदेव , राणी लक्समीबाई आणि इतर अनेकांच्य संघर्ष भारतीय कधीही विसरू शकत नाहीत
स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे हेतू म्हणजे तरुणांच्या मनात त्यांच्या मातृभूमीबद्दल देशभक्तीची भावना जागृत करणे होय.

हे नक्की वाचा:

तर मित्रांनो तुम्हाला हा स्वातंत्र्य दिन निबंध मराठी – Independence Day Nibandh in Marathi, Essay on Independence Day in Marathi निबंध कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की कळवा व या निबंधाला आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा.

Leave a Comment