Majhi Shala Nibandh Marathi | माझी शाळा निबंध | My School Essay in Marathi

नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुमचं आमच्या पोस्टमध्ये आज अहमी तुम्हाला माझी शाळा निबंध ( Majhi Shala Nibandh Marathi) काय आहे त्याच बरोबर माझी शाळा निबंध बदल माहिती देणार आहोत तरी तुम्ही माझी शाळा निबंध (my school essay in marathi) हि पोस्ट पूर्ण वाचा हीच विनंती.

माझी शाळा निबंध | Majhi Shala Nibandh Marathi

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात शाळाही अतिशय महत्त्वपूर्ण भाग आहे. शिक्षणाची खरी सुरवात तर आपल्या जीवनात शाळेपासूनच होते. माझी शाळा म्हणलं की सर्वात पहिल्यांदा डोळ्यासमोर एक इमारत, मुले, मुली, शिक्षक, मुख्याध्यापिक येतात. आपल्या जीवनाला आकार देण्याची सुरुवात शाळेपासूनच होते.

सर्वांना आपल्या शाळेचा पहिला दिवस तर नक्कीच आठवत असेल. शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन दप्तर, नवीन बूट, नवीन गणवेश, नवीन वह्या पुस्तके याची तर खरी गंमत असते. आणि शाळेत आपल्याला खूप मित्र मैत्रिणी देखील भेटतात. “नमस्कार माझ्या ज्ञानमंदिरा सत्यम शिवम सुंदरम….”.रोज सकाळी आपण शाळेत गेल्यानंतर नाव पहिली प्रार्थना म्हणले जाते. मग सर्वजण रांगेमध्ये आपापल्या वर्गामध्ये जातात.वर्गामध्ये पहिल्यांदा हजेरी घेतली जाते. मग विषय शिकवायला सुरुवात होते.

Majhi Shala Nibandh Marathi
Majhi Shala Nibandh Marathi | माझी शाळा निबंध | My School Essay in Marathi

शाळेचे वर्णन शब्दात करणे अवघडच आहे कारण शाळेचे वर्णन शब्दात करता न येणारे आहे.माझ्या शाळेचे नाव साधना कन्या विद्यालय आहे.माझी शाळा मला खूप आवडते आणि मला शाळेत जायला देखील खूप आवडते.माझी शाळा खूप शिस्तप्रिय आहे. शाळेमध्ये गणवेश हा ठराविक असतो आणि तो रोज घालावा लागतो.शाळेमध्ये शिस्तीचे खूप काटेकोरपणे पालन केले जाते.शाळेमध्ये शाळा भरताना, मधल्या सुट्टीमध्ये, आणि शाळा सुटताना घंटा वाजते.

माझ्या शाळेमध्ये प्रत्येक विषय शिकवायला वेगवेगळे शिक्षक आहेत. पुस्तकी ज्ञानाबरोबरच जगातील घडामोडी देखील सांगितल्या जातात.आमच्या शाळेमध्ये आम्हाला रोज गृहपाठ दिला जायचा.आणि तो आम्ही पूर्ण नाही केला तर आम्हाला शिक्षा देखील मिळायची. शाळेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. शाळेतील महत्त्वाचा भाग म्हणजे परीक्षा. परीक्षेत सर्वांना द्यावेच लागते. यातून आपल्याला किती गुण मिळाले हे देखील कळते.

शाळेची सहल म्हणजे विचारायलाच नको….वर्षातून एकदा तरी शाळेची सहल नेली जाते.शाळेच्या वयामध्ये आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शिक्षकांबरोबर फिरायला मिळते. सहलीला तर खुप मज्जा येते. शाळेमध्ये नृत्य, गायन, खेळ असतात. खेळामध्ये एक समूह तयार केला जातो आणि त्यांची प्रॅक्टिस घेतली जाते.आणि खेळांमध्ये तर खूप मज्जा येते.कोणाला खेळायला आवडते, तर कोणाला गायला आवडते, किंवा कोणाला नृत्य करायला आवडते. शाळेमध्ये नृत्यची आणि गायनाची स्पर्धा देखील असते. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार त्यात भाग घेत असतो.

शाळेमध्ये संगणक कक्ष असते. आता आपल्याला संगणकाचे ज्ञान दिले जाते. प्रयोगशाळा देखील असते. त्यात विज्ञानाचे प्रयोग करता येतात. शाळेमध्ये भव्य मैदान असते आपण त्यात सर्व प्रकारचे खेळ खेळू शकतो. खेळाचा तास देखील असतो. लंगडी, खोखो, कबड्डी, रस्सी उडी, गोळा फेक असे खेळ खेळायचो.शाळेमध्ये सांस्कृतिक कलागुणांना देखील वाव दिला जायचा. यातून विद्यार्थ्यांचे गुण दिसून यायचे.कोण कशामध्ये हुशार आहे तर कोण कशामध्ये.

लहानपणी सर्वांना प्रश्न विचारला जायचा की तुला मोठे होऊन काय बनायचे. तर कोण पोलीस, डॉक्टर, इंजिनियर, ड्रायव्हर उत्तर द्यायचे. आमच्या शाळेमध्ये अतिशय चांगले शिक्षण दिले जाते.प्रत्येकाला शिक्षण मिळणे हे गरजेचे आहे.ते सर्वांना मिळायलाच हवे.

हे नक्की वाचा :

समाप्त

तर मित्रांनो येथे आपण या माझी शाळा निबंध, Majhi Shala Nibandh Marathi, My School Essay in Marathi बदल माहितीला समाप्त करत आहे तरीही तुम्हाला माझी शाळा निबंध in Marathi माहिती कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच नवी-नवीन माहितीसाठी आमच्या Blog ला भेट देत जा.

मित्रांनो तुम्हाला कोणत्या गोष्टी संबंधित माहिती पाहिजे असेल तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आम्ही तुमच्यासाठी नक्कीच ती माहिती देऊ. हि पोस्ट तुमच्या friends सोबत जरुर शेयर करा.अशाच नव नविन माहिती साठी आमच्या वेबसाइट रोज भेट देत जा.

2 thoughts on “Majhi Shala Nibandh Marathi | माझी शाळा निबंध | My School Essay in Marathi”

Leave a Comment