100+ मराठी वाक्प्रचार व अर्थ – Marathi Vakprachar List With Meaning

100+ मराठी वाक्प्रचार व अर्थ | Marathi Vakprachar List With Meaning | marathi vakprachar free pdf | vakprachar in marathi with meaning

Marathi Vakprachar List With Meaning
Marathi Vakprachar

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या महत्त्वाच्या पोस्टमध्ये तिथे आम्ही तुम्हाला मराठी वाक्यप्रचार (Marathi Vakprachar) बद्दल माहिती देणार आहोत त्याच बरोबर vakprachar in marathi with meaning शेअर करणार आहोत. मराठी व्याकरण मध्ये सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे वाक्यप्रचार त्यामुळे जर तुम्हाला मराठी व्याकरण शिकायचे असेल तर तुम्हाला marathi Vakyaprachar येने खूप गरजेचे आहे.

मराठी वाक्प्रचार व अर्थ – Marathi Vakprachar List With Meaning

 • र भरून येणे -गदगदून येणे
 • अंगात वीज संचारणे  -अचानक बळ येणे 
 • अंगवळणी पडणे- सवय होणे
 • अंत पाहणे- शेवटचे मर्यादा गाठेपर्यंत कस पाहणे सतत त्रास देऊन हैराण करणे
 •  ओहोटी लागणे -उतरती कळा लागणे 
 • अभय देणे -भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे
 • अजरामर होणेेे -नाव कायम कोरले जाणे
 • अन्नन्न दशा येणे -अत्यंत गरीबीमुळे खायला न मिळणे
 •  कान उघडणे करणे -चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे 
 • कान उपटणे- कडक शब्दात समज देणे
 •  कान टोचणे- खरखरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे
 •  कान फुंकणे -चुगली करणे. 
 • काम निवणे -ऐकून समाधान होणे. 
 • कानाला खडा लावणे -एखाद्या गोष्टीच्या वाईट अनुभवावरून ती टाळणे
 • कानावर हात ठेवणे -कबूल न करणे.
 •  खजील होणे -केलेल्या चुकीची लाज वाटणे 
 • खडे चारणे -हरवणे पराभव करणे 
 • खडे फोडणे- दुसऱ्याला दोष देणे 
 • गळ्यापर्यंत बुडणे -कर्जबाजारी होणे 
 •  गदगदून येणे- गहिवरून येणे
 • गळा काढणे -मोठ्याने रडणे.
 • गळा गुंतणे -अडचणीत सापडणे.
 • घर चालणे -कुटुंबाचा निर्वाह होणे. 
 • घरोबा असणे -जिव्हाळ्याचे प्रेमाचे संबंध असणे 
 • चाल करून येणे- हल्ला किंवा आक्रमण करणे
 •  चाहूल घेणे -अंदाज घेणे कानोसा घेणे अंदाज घेणे
 •  चीज होणे -कष्ट सफल होणे. 
 • जीभ  सोडणे  -वाटेल ते बोलणे
 •  जीव की प्राण असणे- खूप आवडणे 
 •  जिवाचे रान करणे -खूप कष्ट करणे 
 • जिवात जिव येणे -सुटकेची भावना निर्माण होणे बरे वाटणे जीवाला
 •  जीव देणे -वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे 
 • झुंबड उडणे -गर्दी होणे
 • टोमणा मारणे -खोचक बोलणे
 •  टंगळमंगळ करणे- काम टाळण्याचा प्रयत्न करणे 
 •  तोंडघशी पाडणे- विश्वासघात करणे 
 • तोंड फिरवणे- नाराजी व्यक्त करणे 
 • तोंडचे पाणी पळणे- अतिशय घाबरणे
 •  तोंड देणे -सामना करणे
 •  तोंड सांभाळून बोलणे -जपून बोलणे 
 • तोंड भरून बोलणे -मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे
 •  तोंड फिरवणे -नाराजी व्यक्त करणे
 • दात धरणे -सूड घेण्याची भावना बाळगणे
 •  दाती तृण धरणे- शरण जाणे
 •  दोन हात करणे- टक्कर देणे 
 • दिवस पालटणे परिस्थिती बदलणे
 •  दिवस फिरणे वाईट दिवस येणे 
 • नाक खुपसणे- नको त्या गोष्टीत उगीच भाग घेणे
 •  नाकी नऊ येणे खूप दमले 
 • नाकाने कांदे सोलणे -ज्यादा शहाणपणा दाखवणे
 •  नाक मुरडणे – नापसंती दाखवणे 
 • नाक घासणे- लाचार होऊन माफी मागणे.
 • डोळ्यांचे पारणे फिटणे -पाहूनआनंद होणे. 
 • डोळ्यात अंजन घालने -चूक लक्षात आणून देणे
 • डोळे पांढरे होणे -धक्कादायक प्रसंग दिसणे 
 • डोळे निवणे- समाधान होणे पाहून बरं वाटणे
 •  डोळे उघडणे- अनुभवाने सावध होणे शहाणे होणे
 • डोळा असणे -पाळत असणे
 • हातावर तुरी देणे डोळ्यादेखत फसवून पळून जाणे
 • हात झटकणे -नामानिराळा होणे 
 • हातचा मळ असणे -एखादी गोष्ट सहज करता येणे
 •  हातघाई वर येणे- मारामारीची पाळी येणे
 •  हात आखडणे- कमी खर्च करणे .
 • हाडे खिळखिळी करणे -खूप मार देणे 
 •  पाठीला पोट -लागणे उपाशी राहिल्याने हाडकुळा होणे.
 • पाय घसरणे- तोल जाणे  मोहात फसणे.
 • पाय धरणे -शरण जाणे माफी मागणे 
 • पायबंद घालणं -आळा घालणं
 •  पाय मोकळे करणे -फिरायला जाणे 
 • पोटात दुखणे- एखाद्याचा आनंद सहन न होणे.
 • तावडीतून सुटणे- कचाट्यातून सुटले 
 • ताकास तूर लागू न देणे -थांगपत्ता लागू न देणे 
 • तिखट बोलणे- जहाल बोलणे 
 • धुळीला मिळणे -नाश होणे दुर्दशा होणे.
 •  धूूम ठोकणे -पळून जाणे 
 • धूळ चारणे- पराभव करणे हरवणे
 • माशा मारणे- विणकामाचा वेळ वाया घालवणे
 •  माग काढणे- शोध घेणे मागावर असणे शोधत असणे 
 • पाळतीवर असणे- निगा  ठेवून असणे
 •  मात करणे -विजय मिळवणे 
 • रक्ताचे पाणी करणे -खूप कष्ट करणे .
 • रक्त आटवणे – खूप कष्ट करणे.
 • वाटेला जाणे -खोडी काढणे 
 • वाकुल्या दाखवणे- चिडवणे
 • सळो की पळो करणे -सतावून सोडणे
 •  सवड मिळणे -मोकळा वेळ मिळणे
 •  सुसाट पळणे- वेगाने पळणे
 • हरभऱ्याच्याा झाडाव चढवणे- खोटी स्तुती करणे
 •  हाती काही  न लागणे -काहीच फायदा न होणे 
 •  हाय खाणे -भीती  घेणे खचून जाणे

तर मित्रांनो आपण येते मराठी वाक्प्रचार व अर्थ – Marathi Vakprachar List With Meaning या माहितीला समाप्त करू जर तुम्हाला मराठी वाक्यप्रचार संबंधित काही शंका येत असेल तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट मध्ये घडू शकतो आम्ही तुम्हाला नक्की मदत करू आणि ह्या पोस्टला आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना पण मराठी वाक्यप्रचार काय असते संबंधित माहिती मिळेल.

Tag – मराठी वाक्प्रचार, Marathi Vakprachar List With Meaning, marathi vakyaprachar, marathi vakprachar free pdf, vakprachar in marathi with meaning, मराठी वाक्प्रचार

Leave a Comment