माझे आवडते संत मराठी निबंध – Maza Avadta Sant NIbandh in Marathi

0

माझे आवडते संत मराठी निबंध – Maza Avadta Sant NIbandh in Marathi: महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा वारसा खूप जुना आहे यामुळे या महाराष्ट्राच्या मातीत खूप सारे संत होऊन गेले त्यांनी आपल्या आपल्या देवभक्ती ने देवालाही प्रसन्न केले. जसे की आपल्याला माहित आहे संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता माळी असे खुप सारे संत या महाराष्ट्र पाहिले व त्यांची भक्ती ही पाहिली.

माझे आवडते संत मराठी निबंध – Maza Avadta Sant NIbandh in Marathi

माझे आवडते संत ज्ञानेश्वर महाराज, भारतभूमी हि महान संतांचू भूमी आहे. संतांनी आपल्याला शिकवणीतून समाजाला वेगळी दिशा दिली। महाराष्ट्रात संत तुकाराम , संत नामदेव , समर्थ रामदास ई संत होऊन गेले. सर्व संतांची शिकवण सारखीच आहे. पण माझ्या पसंतीचे संत ज्ञानेश्वर महाराज आहेत. संत ज्ञानेश्वर यांनी अतिशय कमी वयात ज्ञानाची प्राप्ती करून समाजाला नवीन दिशा दिली .ते महाराष्ट्रातील महान संत व कवी होते .

संत ज्ञानेश्वरांचा जन्म औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण जवळील आपेगाव येथे ई स १२७५ साली झाला त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होते. आईचे नाव रुख्मिणीबाई होते. त्यांचे वडील एक संन्यासी होते .निवृत्ती नाथ सोपानदेव , मुक्ताबाई व ज्ञानेश्वर असे ते चार भावंडं होते.

निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे पहिले गुरु होते. त्यांच्या वडिलांनी गृहस्थाश्रम त्यागातून संन्यासा श्रमाचा स्वीकार केला होता. परंतु गुरूच्या आज्ञाप्रमाणे पुन्हा गुरहस्थाश्रमाचा स्वीकार केला.या सनातली समाजात एका संन्यासी व्यक्तीने गृहस्थाश्रमात स्वीकार कारणे मंजूर नव्हते. त्यामुळे विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यात आले.

ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांना ब्राम्हण मुलांना मिळणाऱ्या संस्कारांपासून वंचित ठेवण्यात आले .त्यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे धर्म शास्त्रींना विचारले. त्यावर केवळ देहदंडचीच शिक्षा आहे असे सांगितले.मुलांना संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्यात भले व्हवावे यासाठी विठ्ठल पंतांनी व रुख्मिणीबाई यांनी देहत्याग केला.

माझ्या मराठीची बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजासी जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके मिळवीन||

या ओळीतून हेय दिसून येते ज्ञानेश्वरांचा मराठी भाषे विषयीचा अभिमान व्यक्त केलाय. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहली. त्याला भावार्थदीपिका म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here