मी झाड बोलतोय मराठी निबंध | Me Zad Boltoy eassy in marathi

तर मित्रांनो स्वागत आहे तुमच आमच्या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला मी झाड बोलतोय मराठी निबंध | Me Zad Boltoy eassy in marathi बद्दल माहिती देणार आहे.शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना बर्‍याच वेळा हा निबंध विचारला जातो.जर तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल तर हि पोस्ट तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल.

मित्रांनो तुम्ही कधी कल्पना केली आहे का जर झाडे बोलू लागली तर होय तर आज मी तुम्हाला झाड बोलतोय या विषयावर निबंध कसा लिहायचा हे सांगणार आहे.चला तर मग पाहूया कसा लिहायचा मी झाड बोलतोय मराठी निबंध

मी झाड बोलतोय मराठी निबंध | Me Zad Boltoy eassy in marathi

मी एक चिंचेच झाड बोलतोय.मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे.आज जवळजवळ वीस वर्षे झाली मी येते तटस्थ उभा आहे.वीस वर्षांपूर्वी याच मातीत माझा जन्म झाला.एका बिया मधून एक छोटसं रोप तयार झालं आणि त्या रोपाच एक विशाल काय झाड तयार झालं.मला अजून आठवतंय जेव्हा मी पहिल्यांदा सूर्याची किरणे अनुभवली होती.पण आज भीती वाटते माझ्या मोठ्या आकारामुळे मला तोडल तर जाणार नाही ना.

Me Zad Boltoy eassy in marathi

माझ्या अंगाखांद्यावर पशुपक्षी खेळतात,विसावा घेतात,त्यांचे जीवन व्यतीत करतात,तर आपले घरटे माझ्या फांद्यांवर बांधतात.तुम्ही त्यांचे घर तोडून टाकता आणि आपले घर बांधतात.जंगले तोडून वस्तीगृह निर्माण करता.आणि एकदा प्राणी जंगलातून बाहेर आला तर जंगल विभागाला दोषी ठरवतात.मी तर नेहमीच तुमच्यासाठी उपयुक्त आहे तरीही माझ्या फांद्या कापल्या जातात.

माझ्या सभोवताली झाडे खूप कमी झाले आहेत.त्यामुळे अनेक पशुपक्षी माझ्या फांद्यांवर घरटी बनवून राहत आहेत.पण आज पक्षी आणि झाडांची संख्या ही खूप कमी होत चालली आहे.कारण माणूस हा विक्षिप्त होत चालला आहे आणि निसर्ग मात्र लुप्त होत चालला आहे.झाडांचे निसर्गात महत्त्वाचे स्थान आहे म्हणजे निसर्गाने मानवाला दिलेला अमृत वरदान झाड आहे.पण मनुष्य झाडे तोडून त्याच निसर्गाचा ऱ्हास करत आहे.पर्यावरणामध्ये झाडांच्या दिवसेंदिवस होणारे कमी प्रमाण यामुळे वातावरणात बदल घडून येतात अवकाळी पाऊस,वादळ अशा परिस्थिती निर्माण होतात.

मनुष्य त्याच्या स्वार्थासाठी मला नेहमीच नष्ट करत आलाय.मी तुम्हाला केवळ सावलीच देत नाही तर कार्बन डाय-ऑक्साइड स्वतःकडे घेऊन तुम्हाला जीवनावश्यक स्वच्छ ऑक्सीजन देत असतो.चांगली गोड फळे देत असतो.झाडे नेहमीच खूप काही देत असतात.परंतु आजकाल वृक्षतोड खूप वाढली आहे.लोक सर्रास झाडांवर कुराडी चालवत आहेत.जंगलांचे प्रमाण कमी होत चालले आहे.यावर आळा घातला पाहिजे, वृक्षारोपण केले पाहिजे.21 मार्च हा दिवस जागतिक वन दिन आणि वृक्षरोपण दिन म्हणून साजरा केला जातो.वैयक्तिक स्तरावर दरवर्षी एक झाड लावलं पाहिजे.

सरकार झाडे लावा झाडे जगवा हि योजना राबवत आहे.त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभाग घेतला पाहिजे. आणि पर्यावरणा मधील माझी संख्या वाढवली पाहिजे.निसर्गाला वाचवा तरच निसर्ग तुम्हाला वाचवेल.

तर मित्रांनो हा होता मी झाड बोलतोय मराठी निबंध | Me Zad Boltoy eassy in marathi .मी अशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा.आणि आम्हाला कमेंट कधी नक्की कळवा.

हे नक्की वाचा :

Leave a Comment