माझी आजी निबंध मराठी: My Grandmother Essay in Marathi

माझी आजी निबंध मराठी: My Grandmother Essay in Marathi

My Grandmother Essay in Marathi

माझी आजी निबंध मराठी: My Grandmother Essay in Marathi

आज आपण माझी आजी निबंध लिहणार आहोत. प्रत्येकासाठी आजी हि महत्वाची आणि आवडती असते. माझी आजी खुप साधी मायाळू प्रेमळ आहे. पूर्वी महिला जास्त शिक्षण घेत नसत तरी देखील माझ्या आजीची ५ वी झाली आहे. तिला वाचायला फार आवडते. ती अनेक पुस्तके वाचते. वर्तमानपत्र देखील वाचते. TV पाहते बातम्या ऐकते ।तिझें शिक्षण जास्त झालेले नाही पण ऐकलेल्या व्यक्तींना देखील मागे पडते ।बोलण्यात वकीलही तिच्यासमोर कमी पडेल.

माझ्या आजीचे नाव सुंदराबाई आहे. तिच्या आईच्या घरी तिला सुंदर म्हणतात. माझी आजी सकाळी लवकर उठते अंघोळ करून देवपूजा करते जपमाळ करते. चहानाश्ता करून ती लवकर शेतात जाते. आमच्या साठी ती शेतामधून पालेभाज्या फळे काकडी बोरे आणते. ती दुग्ध उत्पादन व्यवसाय करते. आणि स्वतः मेहनत करते. कष्ट करायला पुढे मागे पाहत नाही. उद्याचे काम ती आजच करून घेते. कल करे सो आज कर , आज करे सो अब , सफलता ‘तेरी हरण चुमेगी आज नाही तो कल. म्हणून ती वेळेअगोदर काम उरकते. हातपाय चातायेत तोवर माणसाने काही तरी करत राहिले पाहिजे अशी ती सतत म्हणत असते.

आम्ही शाळेत असताना दिवाळी , उन्हाळ्याच्या सुट्टीत सोबत आम्ही सगळे गप्पा मारायचो. ती रोज आम्हाला गोष्टी सांगायची. नवनवीन खाऊ बनवती. पूर्वी वीज नव्हते त्यामुळे त्यांचे जीवन कसे होते या बद्दल ती सांगायची त्यावेळी बस नव्हत्या जास्त काही सुखसुविधा नव्हत्या.

प्रत्येकाला आजी असायला पाहिजे कारण आजीचे लाड कौतुक , प्रेम करते ते नेहमीच हवेहवेसे वाटते. शेजारच्या लोकांना देखील माझ्या आजीचा खूप धार वाटतो. आजी त्यांना पण मदत करते. परीक्षेच्या वेळी आजी आम्हाला अभ्यास करण्यासाठी पहाटे लवकर उठवायची. आमचं पाठांतर करून घ्याची. मनाचे श्लोक , कविता प्रश्न उत्तरे.
आणखी एक आजी आहे मला माझ्या आईची आई. सुट्ट्यांमध्ये आम्ही मामाच्या गावाला जातो ।तिथ आहे माझी दुसरी आजी. ती आजी पण माझे खूप लाड करते. मस्त पदार्थ बनवते मजेदार गोष्टी सांगते. दोन्ही आजी सारख्याच आहेत , प्रेमळ आणि मायाळू.

हे नक्की वाचा:

Leave a Comment