नागपंचमी सण मराठी (Nagpanchami Information in Marathi ) :नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी नागाची पूजा करून नागदेवताला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा प्रभाव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आहे तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हा पासून नागपंचमी हा सण साजरा केला जातो.
नागपंचमी का साजरी केली जाते: Nagpanchami Information in Marathi
अनंत वासुकी शेष कम्बल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या ९ नागांची या दिवशी पूजा केली जाते. श्रवण महिन्यातील पहिला महत्वाचा सण म्हणजे नागपंचमी. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.

नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया मुख्यतः नागाची पूजा करतात. जिवंत नागाऐवजी नागाची मातीची मूर्ती पाटावर ठेवून त्याची पूजा करतात. युद्ध लाह्यांचा नैवद्य दाखवला जातो. या दिवशी सर्पाकृती भाज्या भक्षण ना करण्याची प्रथा आहे. विळी चाकू सूरी , तवा या साधनांचा उपयोग न करता अन्न केवळ शिजवून ते खाण्याची प्रथा आहे. या दिवशी शेतकरी नांगरत नाही. कोणीही खणात नाही.
या दिवशी नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. कही हिकानी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणतात. वारुळाची पूजा करतात भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जात.
नागपंचमी सणाची कथा :
एका गावात एक गरीब शेतकरी कुटुंब राहत होते. त्या शेतकऱ्याला एक मुलगी व २ मुले होती. एकदा शेतात नांगर फिरवत असताना शेतकऱ्याकडून नागाची ३ पिल्ले चिरडून मारली गेली. मरण पावलेल्या पिल्लांकडे पाहून नागिणीने आक्रोश केला. त्यानंतर नागिणीच्या मनात त्या शेतकऱ्यांविषयी सुडाची आग धगधगू लागली. एके दिवशी तिने शेतकऱ्याचा सूद घ्यायचे ठरवले. रात्री अंधाराचा फायदा घेऊन नागीण शेतकऱ्यांसह त्याची पत्नी व २ मुलांना डसली. दुसऱ्या दिवशी नागीण पुन्हा शेतकऱ्याच्या मुलीला डसण्यासाठी त्याच्या घरी आली. परंतु नागिणीला पाहताच शेतकऱ्याच्या मुलीने नागिणी समोर दुधाची वाटी ठेवली व तिची क्षमा मागितली. शेतकरीच्या मुलीची श्रद्धा पाहून नागीण तिच्यावर प्रसन्न झाली. नंतर नागिणीने तिचे आई वडील व २ भावांना जिवंत केले. तो दिवस श्रावण शुक्ल पंचमीचा. या दिवसापासून नागदेवतेच कोप दूर करण्यासाठी श्रावण महिन्यात येणाऱ्या पंचमीला नागाचे विधिवत पूजन केले जाते.
या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो असं भारतात रूढ प्रथा आहे । नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेहेंदी लावायची पद्धत आहे. झिम्मा फुगडी खेळेल जातात.
हे नक्की वाचा: