महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (MSRTC) नागरिक स्मार्ट कार्ड जारी करण्याची मुदत वाढली. अंतिम मुदत आता 31 मार्च 2022 आहे.

एस टी स्मार्ट कार्ड बद्दल संबंधित महत्त्वाची अपडेट! मित्रांनो एसटी महामंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार महामंडळाच्या बसेस मधून सवलतीच्या दरात सामान्य नागरिकांना प्रवास करता यावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवित आहे. महाराष्ट्र परिवहन मंडळाने विद्यार्थ्यांना, ज्येष्ठांना समाजातील इतर गटातील 29 घटकांना एसटीचा सवलती दारातून प्रवास करता यावा म्हणून नवीन योजना उपयोजिली होती. महाराष्ट्र सरकारने मेट्रो प्रमाणेच एसटी महामंडळाची स्मार्ट कार्ड योजना सुरू केली होती.

या योजनेत प्रवाशांना स्मार्ट कार्ड दिली आहेत. त्यामुळे कागदी पास सांभाळण्याचा त्रास वाचणार आहे. कार्ड रिचार्ज करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. स्मार्ट कार्ड आधार कार्डशी संलग्न केले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड काढण्याची मुदत वाढवून 31 मार्च 2021 पर्यंत दिली होती. पण कोरूना च्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात परिस्थिती पाहून एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजनेत पुन्हा एकदा मुदतवाढ जाहीर केली होती. स्मार्ट कार्ड योजनेला मुदतवाढ 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मिळाली होती.

पण काही तांत्रिक अडचणीमुळे स्मार्ट कार्ड बनविण्याच्या योजनेत पुन्हा मुदतवाढ मिळाली आहे. एसटी महामंडळाचे स्मार्ट कार्ड योजनेला राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी मुदतवाढ जाहीर केली. आहे.सवलतीमध्ये प्रवास करण्याच्या योजनेला 31मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे. मित्रांनो 1एप्रिल 2022 पासून सवलती तिकीट भाडे जर प्रवाशाला प्राप्त करायचे असेल तर त्याच्यापाशी स्मार्ट कार्ड असणे बंधन कारक आहे.

Leave a Comment