पत्र लेखन मराठी नमूने व माहिती | Patra Lekhan in Marathi | Marathi Patra Lekhan | पत्र लेखन मराठी निबंध:
Marathi Patra Lekhan: नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेबसाईटवर या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला सतत अभ्यासाबद्दल माहिती देत असतो. तरी तुम्ही ह्या वेबसाईट ला रोज भेट द्यावी व नवनवीन गोष्टी शिकाव्या अशी विनंती.

आज आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत पत्र लेखन मराठी कसे केले जाते व मराठी पत्र लेखन कसे करावे जर तुम्हालाही मराठी पत्र लेखन (Patra Lekhan in Marathi) शिकायचे असेल तर हि पोस्ट तुम्ही नक्की वाचा जेणेकरून तुम्हीही पत्रलेखन संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल.
पत्र लेखन मराठी नमूने व माहिती 2021 | Patra Lekhan in Marathi
Patra Lekhan in Marathi: त्याआधी आपण जाणून की पत्र लेखन का केले जाते तर तुम्हाला सांगू इच्छितो की पत्र लेखन करण्यामागचे उद्दिष्ट आहे की आधीच्या काळी दूरध्वनी नसल्याने संपर्कात नसलेले लोक लोकांशी संपर्क साधण्यासाठी पत्र लेखन केले जाते जेणेकरून तुम्हाला आपल्या आवडत्या नातेवाईकांशी संपर्क करता येतो. किंवा कोणताही महत्त्वाचा संदेश लवकरात लवकर पोचवण्यासाठी पत्रलेखन होते ना द्वारे ंदेश एका जागेवरून दुसर्या जागेवर पोचवला जातो.
पत्रलेखनाचे मुख्य दोन प्रकार आहेत एक औपचारिक पत्र लेखन आणि दुसरं अनोपचारिक पत्र लेखन
1 ) औपचारिक पत्र लेखन:
औपचारिक पत्र लेखन हे मुख्यतः एक विशिष्ट कामानिमित्त लिहिली जाते. म्हणजे औपचारिक पत्र लेखन हे जेव्हा तुम्हाला कोण अनोळखी व्यक्तीशी संपर्क साधायचा असेल त्या वेळेस तुम्हाला हे औपचारिक पत्र लेखन लिहिले जाते. हे पत्र मुख्यता पदाधिकारी, ग्रहक, विक्रेता, शिक्षक यांसाठी लिहिले जाते.
2) अनोपचारिक पत्र लेखन:
अनौपचारिक पत्र लेखन मागचे मुख्य उद्देश फक्त आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांची हाल हवा जाणून घेण्यात करिता लिहिले गेले पत्राला अनौपचारिक पत्र असे संबोधले जाते. म्हणजे जर तुम्ही शहरात राहत असाल आणि तुम्हाला तुमच्या गावात राहणाऱ्या आई-वडिलांशी संपर्क साधायचा असेल त्यावेळेस लिहिलेले पत्र अनौपचारिक पत्र म्हणतात. या पत्र मागचा उद्देश फक्त गावाकडे जाणाऱ्या आई-वडिलांची चौकशी हा हेतु आहे.
मागणी पत्र लेखन मराठी – Magni Patra Lekhan in Marathi
1 ) क्रीडा साहित्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापकांसाठी लिहिले गेलेले मागणी पत्र –
प्रति
माननीय मुख्याध्यापक
श्रीधर मुरकुटे
साथी विद्यालय
पुणे- 14
विषय – खेळाचे साहित्य मागण्याकरिता विनंती पत्र
महोदय,
मी आपल्या सारथी विद्यालय इयत्ता दहावीत शिकणारा विद्यार्थी आहे. मागच्या वर्षी झालेल्या क्रिकेट स्पर्धेत आपल्या विद्यालय ने प्रथम पारितोषिक पटकावले होते. तरी यावर्षीदेखील होणाऱ्या क्रिकेट स्पर्धेत आपल्या विद्यालयाला भाग घ्यायचा आहे. परंतु आपल्या विद्यालय मध्ये खेळाचे साहित्य कमी पडत असल्याकारणाने सराव करण्यास व्यतय येत आहे.
बैट | 3 नग |
बॉल | 6 नग |
स्टंप | 2 नग |
फुटबॉल | 1 नग |
क्रिकेट किट | 3 नग |
तरी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की आपण लवकरात लवकर आम्हाला सरावासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून द्यावे.
आपला विश्वासू
सुधीर झगडे

अभिनंदन पत्र लेखन मराठी – Abhinandan Patra Lekhan in Marathi
2) भावाने शाळेत प्रथम क्रमांक पटकावल्या बद्दल त्याचे अभिनंदन साठी लिहिलेले मराठी पत्र
अभिनंदन
सागर आगरकर
BSIOTR,, Wagholi
पुणे- 14
प्रिय सागर,
जसे मला कळाले की तुझा मागील वर्षी झालेल्या बारावी परीक्षेत तुमच्या संपूर्ण विद्यालय मध्ये प्रथम क्रमांक तुझा आलेला आहे हे समजल्यावर मला खूप आनंद झाला अशीच प्रगती करत रहा. तू इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवल्याबद्दल मी तुझे अभिनंदन करण्यासाठी हे पत्र लिहीत आहे.
तुझ्या भावी वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा असाच पुढे जात रहा. अशीच प्रगती करत रहा जेणेकरून तू एक दिवस आपल्या आई वडिलांचे नाव नक्की वर नेचील. मला तुला खूप पहावेसे वाटले आहे तुला खांद्यावर घेऊन संपूर्ण गावात फिरावे असे वाटले आहे मी नक्कीच तुला येणार्या दिवाळीच्या सुट्टीत भेटेल तेव्हा आपण नक्कीच मजा करू.
तुझा भाऊ
अभिषेक
3) जिगरी मित्राला वाढदिवसाचे आमंत्रण पत्र – Birthday invitation Letter in Marathi For Friend
12, मुक्ताई कॉलोनी
गंगा नगर, हडपसर
पुणे- 13
प्रिय विवेक,
जसे की तुला माहित आहे 15 जुलै रोजी माझा वाढदिवस येत आहे आणि हा वाढदिवस माझा तिसावा वाढदिवस असल्याकारणाने माझ्या आई-वडिलांनी हा वाढदिवस मोठा करण्याचे योजिले आहे. तरी तू माझा जिगरी मित्र असल्याकारणाने तू माझ्या वाढदिवसाला यावे अशी विनंती करतो. तू व काका-काकू नक्की माझ्या वाढदिवसाला या.
यावेळेस माझ्या आईवडिलांनी माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम ठेवलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला माझ्यासोबत पाहिजे त्यामुळे तू नक्की माझ्या वाढदिवसाला ये अशी विनंती मी तुला करतो
तुझा प्रिय मित्र
अभिषेक

तर मित्रांनो आपण येथे या पत्र लेखन मराठी नमूने व माहिती 2021 | Patra Lekhan in Marathi या माहितीला समाप्त करते हो आशा करतो ही सर्व माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल जर तुम्हाला मराठी पत्र लेखन (Marathi Patra Lekhan) संबंधित कोणतीही शंका असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की विचारू शकता आम्ही तुम्हाला नक्की मदत करू.
अशाच नवीन नवीन व अभ्यासात संबंधित माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नक्की भेटत जावा व या माहितीला आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही नवनवीन माहिती जाण्यासाठी मदत होईल.
- 1 to 100 मराठी अक्षरी अंक | 1 to 100 Numbers
- List of Vegetable Names in Marathi
- वीज नसती तर मराठी निबंध | Vij Nasti Tar Nibandh Marathi
Tag – marathi patra lekhan, patra lekhan in marathi, पत्र लेखन मराठी, patra lekhan marathi 2020-2021, पत्र लेखन मराठी निबंध
Aap ke pas marathi
jahirat lekhan ke bareme kucha jankari hai
Ok 👌
Thanks Bhai
Mi tula vaddivshachya subhekhchya dete