प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना, महत्त्वाच अपडेट !

प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना, महत्त्वाच अपडेट ! – मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकरी ज्या आतुरतेने या योजनेची वाट पाहत आहेत अशा कुसुम सोलर पंप योजनेच महत्वाचे अपडेट आहे. मित्रांनो महाराष्ट्रात 14 सप्टेंबर 2021 रोजी पासून या योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती. यामध्ये लाभार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी रुपये 2750 रुपये आकारण्यात आले यानंतर लाभार्थ्यांकडून रजिस्ट्रेशन आणि त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात आली आणि 1,85,000 लाभार्थ्यांचे अर्ज रजिस्ट्रेशन करण्यात आले. यामध्ये किमान 66,000 लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे देखील अपलोड केलेले येतात आणि प्रत्येक अशा पात्र झालेल्या लाभार्थ्यांना प्रतीक्षा लागली होती ती म्हणजे योजनेतून मिळणाऱ्या रकमेची आणि योजनेमधील पुढील प्रक्रियेची मात्र मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून नवीन पुरवठा दर दिले जातील. आणि सर्व माहिती अपडेट झाल्यानंतर महाराष्ट्रमध्ये पुन्हा ही योजना ऑक्टोबर मध्ये सुरू होईल असे सांगण्यात आले.यानंतर डिसेंबर मध्ये ही योजना सुरू होईल असे अपडेट देण्यात आले होते.

यामध्ये आपण पाहिले तर कुसुम सोलार पंप योजना आहे या योजनेमध्ये जे काही वेंडर सेलेक्शन केले जाते ते त्यांचे दर जे निश्चित केले जातात यासाठी अंमलबजावणीची प्रक्रिया आहे, मार्गदर्शक सूचना आहेत. आणि याच गाईडलाईन्स माध्यमातून केंद्र शासनाने पूर्ण देशासाठी या ठिकाणी वेंडर सिलेक्शन साठी त्याचप्रमाणे त्यांच्या दर निश्चितीसाठी एक समिती बनवण्यात आली आहे. आणि दर समितीतिच्या माध्यमातून निश्चित केली जातात. मात्र हे दर निश्चित करत असताना बऱ्याच राज्यांमध्ये वेंडर उपलब्ध नसल्यामुळे या योजनेची पूर्णपणे अंबलबजावणी होत नाही असे निदर्शनास आल्यामुळे यासाठी 8 डिसेंबर 2021 रोजी झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सल्लामसलत करण्यात आली होती. याच बैठकीच्या पार्श्वभूमीवर 14 डिसेंबर 2021 रोजी MNRE च्या माध्यमातून काही महत्वपूर्ण गाईडलाईन्स निर्गमित करण्यात आले आहेत.

ज्याच्या मध्ये आपण पाहिले तर केंद्रीय पद्धतीने जे काही सिलेक्शन केले जात होते. निश्‍चिती केली जात होती. याऐवजी प्रत्येक राज्याला आपला पुरवठा दर निश्चित करण्याचा अधिकार आहे. म्हणजेच महाराष्ट्र सरकारला जर महाराष्ट्रसाठी पुरवठा दर निवडायचा असेल तर महाराष्ट्र सरकारला याचा पूर्णपणे अधिकार आहे. मित्रांनो ज्याप्रमाणे मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेत वेंडर सिलेक्शन केले जात होते. त्याच प्रमाणे पीएम कुसुम सौरपंप या योजनेत देखील पुरवठादार हे राज्य शासनाच्या माध्यमातून निवडले जातील. पुरवठा दराची निवड झाल्यानंतर विभागानुसार कोटा निश्चित केला जाईल. या योजनेच्या अंतर्गत पेमेंट ऑप्शन या ठिकाणी सुरू केले जाईल. लवकरच महाऊर्जेच्या माध्यमातून अशा प्रकारची सूचना काढण्यात येईल. पुरवठा दराची निश्चित झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होईल. महाऊर्जा आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत योजना राबवली जाईल.

मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेबाबत महत्त्वाच अपडेट आहे. अशाच नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या वेबसाईट पेजला विजिट देत जा.

Leave a Comment