संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध | Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या वेबसाईटवर आज आपण या पोस्टमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध, Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi या विषयावर चर्चा करणार आहोत. जर तुम्ही प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण घेत असाल तर हि पोस्ट तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरेल.

संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकात थोर संत होऊन गेले.अवघ्या वयाच्या सोळाव्या वर्षात ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला होता. वारकरी संप्रदायात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. त्यांनी जगाला समतेचा उपदेश केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रबोधक म्हणूनही त्यांना ओळखले जाते. चला तर मग पाहूया संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध.

संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध| Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi

वारकऱ्यांचे दैवत संपूर्ण वारकरी संप्रदायाची माऊली ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी आपल्या 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी भक्तिमार्गाने लोककल्याणासाठी प्रबोधन केले. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका), अमृतानुभव, चांगदेवपाष्टी, अभंग या प्रकारच्या साहित्यरत्न केल्या.अध्यात्म अन तत्वज्ञान हे मराठी माध्यमातून व्यक्त करता येतात असा विश्वास संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ग्रंथातून निर्माण केला.

संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म (आपेगाव) पैठण, औरंगाबाद येथे तेराव्या शतकात 1275 मध्ये झाला. ज्ञानेश्वर महाराज कुळाने ब्राह्मण होते.ज्ञानेश्वरांचे पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना दोन भावंडे एक बहिण होती. ज्ञानेश्वरांच्या मोठ्या भावाचे नाव निवृत्तीनाथ असे होते तर सोपानदेव व मुक्ताबाई ही त्यांची धाकटी भावंडे होती.

Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत हे मुळात एक संन्यासी होते. विवाह झाला असतानासुद्धा त्यांनी संन्यास घेतला . काशीला जाऊन उपासना करू लागले. त्यांच्या गुरूंना ते विवाहित असल्याचे समजल्यावर त्यांच्या गुरूंनी त्यांना परत सांसारिक जीवन जगण्यासाठी पाठवले त्यांच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत यांनी पुन्हा संसारात प्रवेश केला त्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई. मग यानंतर विठ्ठल पंत तीर्थयात्रा करत करत आळंदी या ठिकाणी स्थायिक त्या काळी संन्यास घेऊन परत संसारिक जीवन यामुळे समाजाने विठ्ठलपंतांच्या घरावर बहिष्कार टाकला. त्याकाळी संन्याशाची मुले म्हणून सर्व समाज चौघा भावंडांची हेटाळणी करीत असे.

समाज अगोदर फक्त विठ्ठलपंत यांना त्रास देत होता. पण आता आपली बायको रुक्मिणी व मुले यांना त्रास झाल्यामुळे एके दिवशी यामुळे विठ्ठल पंत काकुलती येऊन म्हणू लागले मी चुकलो मला क्षमा करा माझ्याकडून अजाणतेपणाने अपराध घडला. पण माझी शिक्षा या निरागस मुलांना का देत आहात त्यांचा काय दोष आहे. माझी चूक झाली कबूल करतो तुम्ही सांगाल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. माझ्या परिवारावर बहिष्कार टाकू नका माझ्या मुलांना जातीत घ्या अशी विनवणी करू लागले.

पण ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांची मुंज करण्याचे व त्यांना आपल्या जातीत घेण्याचे आळंदीच्या ब्राह्मणांनी नाकारले यावर विठ्ठलपंतांनी उपाय काय असे विचारल्यावर आळंदीतील सर्व ब्राह्मणांनी त्यावर केवळ देहांत प्रायश्चित्त ही शिक्षा आहे असे सांगितले मुले संस्कृतीपासून संस्कारांपासून वंचित राहू नये व त्यांचे भविष्य भले व्हावे यामुळे विठ्ठलपंत आणि रुक्मिणी बाई यांनी आत्महत्या करून देहांत प्रायश्चित्त करण्याचा निर्णय घेतला. आई आणि वडील यांच्या देहांतनंतर ज्ञानेश्वर माऊली व त्यांच्या भावंडांना खूप हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्या. आई-वडिलांच्या देहांतनंतरही सर्व समाजाने त्यांना खूप त्रास दिला.

संत ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांचा मराठीभाषेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंडे सत्यवचनी, सदाचारी होती. निवृत्तीनाथ महाराज संत ज्ञानेश्वरांचे गुरु होते. संत ज्ञानेश्वरांनी भगवद्गीतेचा अर्थ संस्कृत भाषेतून मराठीत सांगितला. आपले गुरू निवृत्तीनाथ यांच्या आशीर्वादाने ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीतेवर प्रख्यात टीका लिहिली मुळात ज्ञानेश्वर महाराजांनी ही टीका सांगितली व सच्चिदानंद बाबा यांनी ती लिहिली या ग्रंथास भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी असे नाव देण्यात आले. भक्तियोग, ज्ञानयोग सांगणाऱ्या ज्ञानेश्वरी मध्ये एकूण 9000 ओव्या आहेत. अर्थात श्रीकृष्णाने सांगितलेले भगवद्गीतेतील उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीत सांगितले. त्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले.यामध्ये त्यांनी भगवंताकडून पसायदान मागितले.

ज्ञानेश्वर महाराजांचा दुसरा ग्रंथ म्हणजे अमृतानुभव विशुद्ध तत्त्वज्ञानाचा आणि जीव ब्रम्ह ऐक्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथात एकूण 800 ओव्या सांगण्यात आले आहे. तत्वज्ञान दृष्टीने हा ग्रंथ श्रेष्ठ आहे. चांगदेव पासष्टी या ग्रंथाद्वारे ज्ञानेश्वर महाराजांनी गर्वहरण केले. चांगदेव हे महान योगी होते. चांगदेवांना उपदेश करत ज्ञानदेव महाराजांनी 65ओव्यांचे पत्र लिहिले.यामुळे या ग्रंथास चांगदेव पासष्टी असे म्हणले जाते.

“अमृतानुभव” या ग्रंथाच्या लेखानंतर ज्ञानेश्वर माउलींनी यात्रा केली यानंतर समाधी घेण्याचा निर्णय घेतला संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली. इसवी सन (1296 गुरुवार) ज्ञानसूर्य मावळल्यानंतर अवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली इहलोकीची यात्रा संपवली.

तर मित्रांनो संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध| Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा.

हे नक्की वाचा :

Leave a Comment