संत एकनाथ महाराजाची सम्पूर्ण माहिती | Sant Eknath information in Marathi

तर मित्रांनो पोस्ट मध्ये आपण पाहणार आहोत. संत एकनाथ महाराजाची सम्पूर्ण माहिती | Sant Eknath information in Marathi मित्रांनो तुम्हाला जर संतांचे चरित्र किंवा त्यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर हि पोस्ट तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

मित्रांनो संत एकनाथ महाराज हे महाराष्ट्रातील थोर संतापैकी एक होते. सर्वसाधारणपणे नाथ म्हणून ओळखले जाणारे संत एकनाथ महाराष्ट्रातील भारुड यासारख्या काव्यप्रकाराचे शिल्पकार होते. त्यांनी आपल्या जीवन कार्य अधिक प्रकारचे ग्रंथ अभंग भारुडे अशा प्रकारचे साहित्य रचले. तर मित्रांनो आपण आज या निबंधात त्यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

संत एकनाथ महाराजाची सम्पूर्ण माहिती | Sant Eknath information in Marathi

महाराष्ट्राच्या भूमीला अनेक संतांचे आशीर्वाद लाभले. म्हणूनच महाराष्ट्रीय संस्कृती आज एकविसाव्या शतकातही कायम आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीमागे संतांची मुख्य भूमिका आहे.याच मातीतल्या थोर संतान पैकी संत एकनाथ हे एक महान संत व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांनी पुढच्या पिढीसाठी अनेक प्रकारच्या काव्यरचना, अभंग लोकांना भागवत ज्ञान देणारे ग्रंथ लिहून ठेवले.आपले आयुष्य ईश्वरचरणी दान केले.

Sant Eknath information in Marathi

संत एकनाथांचे जीवन

संत एकनाथांचा जन्म हा इसवी सन 1553 मध्ये पैठण येथे झाला. संत भानुदास एकनाथांचे पणजोबा ते सूर्याची उपासना करत सूर्यावर त्यांची भक्ती होती. त्यामुळेच श्री संत एकनाथांच्या वडिलांचे नाव त्यांनी सूर्यनारायण ठेवले. श्री संत एकनाथांचे पूर्ण नाव एकनाथ सूर्यनारायण कुलकर्णी असे होते संत एकनाथ हे जातीने ब्राह्मण होते. नाथांच्या आईचे नाव रुक्मिणी होते. आई-वडिलांचा सहवास त्यांना फार काळ लाभला नाही. लहान असतानाच त्यांचे आई-वडील त्यांच्यापासून दुरावले एकनाथांचे पालन-पोषण त्यांचा सांभाळ त्यांच्या आजोबांनी केला. चक्रपाणि आणि सरस्वती हे त्यांचे आजोबा होते आजी आजोबा होते.

संत एकनाथांचा विवाह वैजापूर येथील गिरिजाबाई नावाच्या एका कन्येशी झाला संत एकनाथ आणि गिरिजाबाई यांना गोदावरी व गंगा या दोन मुली आणि हरी नावाचा एक मुलगा झाला पुढे त्यांच्या मुलाला हरिपंडित म्हणून ओळखले गेले त्याने नाथांचे शिष्यत्व पत्करले.संत ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे दोनशे ते अडीशे वर्षांनी एकनाथांचा जन्म झाला. संत एकनाथांनी मराठी भाषेत अनेक प्रकारचे साहित्य रचली ते हुशार आणि ज्ञानी होते. संत एकनाथांना युगप्रवर्तक म्हटले जाते. त्यांनी भारुडे, अभंगाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, जातीयतेचा विरोधात कार्य केले. डोळस आणि कृतिशील समाज निर्मितीसाठी प्रयत्न केले. आपल्या मायबोली मराठी भाषेला त्यांनी लोक भाषा बनवली.

पूर्वीच्या काळात जातिवाद, अस्पृश्यता, समाज या गोष्टींना प्राधान्य दिले जात होते. ज्या काळात ब्राह्मण अस्पृश्यांना स्पर्श करणे म्हणजे पाप असे मानत होते. त्या काळात संत एकनाथांनी नदीकाठी चुकलेल्या अस्पृश्याच्या मुलास कडेवर घेऊन हरिजनवाड्यात पोहोचवले होते. वडिलांच्या श्राद्धात ब्राह्मणांसाठी बनवलेले अन्न एकनाथांनी अस्पृश्यांना सुद्धा खाऊ घातले होते. पाषाणाचा नंदीला गवताचा घास भरवला होता. त्यांना गरिबाबद्दल कळवळत होती. समाजात जातिवाद नसून समानता असावी असे त्यांचे मत होते.

नाथांचे कार्यलेख

एकनाथांचे गुरु सद्गुरु जनार्दन स्वामी देवगड (देवगिरी) येथे यवन दरबारी अधिपती होते. जनार्दन स्वामी हे मुळशी चाळीसगावचे रहिवासी होते. त्यांचे आडनाव देशपांडे होते गुरु म्हणून संत एकनाथांनी त्यांना मनोमन म्हणून वरले होते नाथांनी परिश्रम करून गुरुसेवा केली आणि साक्षात दत्तात्रेयांनी त्यांना दर्शन दिले द्वारपाल म्हणून दत्तात्रेय नाथांच्या द्वारी उभे असत असे म्हणतात.

संत एकनाथांनी अनेक प्रकारच्या काव्यरचना केल्या साहित्यरचना केले. जोगवा, अभंगरचना, गोंधळ भारुड या प्रकारच्या साहित्याने जनजागृती केली. समाज प्रबोधन केले.संत एकनाथ हे संतकवी, पंतकवी व तंतकवी होते. एकनाथी भागवत हा त्यांचा लोकप्रिय ग्रंथ आहे. ही एकादश स्कंदावरील टीका आहे. मुळात एकूण 1367 श्लोक आहेत. परंतु त्यावर भाष्य म्हणून 18810 ओव्या संत एकनाथांनी लिहिल्या आहेत. व्यासांनी रचलेले मूळ भागवत 12 स्कंदांचे आहे. नाथांनी लिहिलेल्या भावार्थ रामायणाच्या सुमारे 40 हजार ओव्या आहेत. दत्तात्रयाची आरती सुद्धा एकनाथांनी लिहिलेले आहे. रुक्मिणी स्वयंवर हे काव्य देखील नाथांनी लिहिले आहे. समाजात समानता असावी असे नाथांचे मत होते. जातिभेद दूर करण्यासाठी एकनाथ यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

संत एकनाथांनी समाजकल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले.अवघ्या वयाच्या 66 व्या वर्षी फाल्गुन वद्य षष्ठी, शके १५२१ (२६ फेब्रुवारी इ.स. १५९९) या दिवशी संत एकनाथांनी समाधि घेतली. एकनाथांनी समाधी घेतल्यानंतर हरिपंडितांनी दरवर्षी नाथांच्या पादुका आषाढीवारीसाठी पंढरपुरास नेण्यास सुरुवात केली.

तर मित्रांनो हा होता संत एकनाथ महाराजाची सम्पूर्ण माहिती | Sant Eknath information in Marathi मी अशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा.आणि आम्हाला कमेंट कधी नक्की कळवा.

हे नक्की वाचा

Leave a Comment