संत नामदेव महाराज मराठी निबंध , Sant Namdev Maharaj Essay in Marathi
नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आमच्या वेबसाईटवर आपण या लेखात संत नामदेव महाराज मराठी निबंध|Sant Namdev Maharaj Essay in Marathi या विषयावर चर्चा करणार आहोत. तुम्हाला जर संतांचे चरित्र व त्यांची माहिती हवी असेल तर हि पोस्ट तुमच्या साठी नक्की फायदेशीर ठरेल.
संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक थोर संत होते. वारकरी संप्रदायात आजही त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. नामदेव महाराजांनी अनेक साहित्यरचना केल्या शेकडो अभंग रचले. नामदेव महाराज हे तेराव्या शतकातील महान संत कवी होते. संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव यांनी सोबत तीर्थयात्रा केली.चला तर मग पाहूया संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती.
संत नामदेव महाराज मराठी निबंध | Sant Namdev Maharaj Essay in Marathi
महाराष्ट्र साधू संतांची भूमी आहे याच भूमीत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत जनाबाई असे थोर संत झाले. यांपैकी संत नामदेव महाराज एक थोर संत, कवी होते. मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या जडणघडणीत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
संत नामदेव वारकरी संप्रदायाचे महान प्रचारक असून त्यांनी पूर्ण भारतभर भागवत धर्माचा प्रचार केला त्यांचे विठ्ठलावर जीवापाड प्रेम होते. पंढरीचा विठूराया म्हणजेच त्यांचे सर्वस्व होते. लहानपणापासूनच त्यांची विठ्ठलावर भक्ती होती.

नामदेवांचे बालपण:
ज्ञानेश्वर महाराजांना समकालीन असणार्या शिरोमणी नामदेव महाराज त्यांचा जन्म 13 शतकात इ.स 1270 साली हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी या गावात झाला. संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेटी रेळेकर असे होते. संत नामदेवांच्या वडिलांचे नाव दामाशेटी तर आईचे नाव गोनाई असे होते.
संत नामदेवांचे वडील दामाशेटी हे पेशाने शिंपी होते म्हणजेच दामाशेटीचा व्यवसाय कपडे शिवणे व ते बाजारात विकणे हा होता. नामदेव महाराजांना लहानपणापासूनच विठ्ठल भक्तीची ओढ होती. संत नामदेवांचे बालपण हे पंढरपुरातच गेले.
नामदेवांचे वडील हे एक विठ्ठल भक्त होते. निती नियमाने दररोज विठ्ठलाला नैवेद्य दाखवायचे व दर्शन घ्यायचे. एके दिवशी नामदेवांचे वडील महत्त्वाच्या कामाने बाहेर गेले होते. नामदेव ही घरातील ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या आईने त्यांना सांगितले की आज वडील घरी नसल्यामुळे तू विठ्ठलाला प्रसाद (नैवेद्य) दाखव .
नामदेव नैवेद्य घेऊन मंदिरात आले व तो नही नैवेद्य देवासमोर ठेवला बसून नैवेद्य विठ्ठल कशाप्रकारे खातो. हे पहात बसले खूप वेळ झाल्यावर पांडुरंग दिसला नाही म्हणून ते विठ्ठलाची याचना करू लागले. व त्यांना म्हणाले तू जर आणलेला नैवेद्य खाल्ला नाही तर इथेच डोके आपटून जीव देईल निरागस भक्ताची भक्ती पाहून पांडुरंग (विठ्ठल) प्रसंग झाला.
साक्षात पांडुरंगाने आणलेला नैवेद्य ग्रहण केला (खाल्ला) असे नामदेव महाराजांच्या आख्यायिकेत सांगितले जाते.
नामदेवांचे जीवनकार्य
संत नामदेवांच्या घरात विठ्ठल भक्तीची परंपरा होती. यांच्या अगोदरच्या सातव्या पिढीतील पुरुष यदुशेट सात्विक वृत्तीचे विठ्ठल भक्त होते. अवघ्या वयाच्या अकराव्या वर्षी संत नामदेवांचा विवाह त्यांच्या गावातील सावकाराची कन्या राजाई हिच्याशी झाला. नामदेवांच्या परिवारात एकूण पंधरा सदस्य होते. त्यामध्ये त्यांची पत्नी, मोठी बहीण आऊबाई ,त्यांची चार मुले नारा, विठा, गोंदा, महादा हे व एक मुलगी लिंबाई होती.
संत गोरा कुंभार यांच्याकडे ते ढोकी येथे. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज ,सोपानदेव, मुक्ताबाई, संत नामदेव, संत चोखामेळा ,संत विसोबा खेचर आदि संतांचा मेळा जमला होता. या प्रसंगी संत ज्ञानेश्र्वरांच्या विनंती वरून गोरोबाकाकांनी उपस्थितांच्या आध्यात्मिक तयारीविषयी आपले मतप्रदर्शन केले होते.
या प्रसंगानंतरच संत नामदेवांना विसोबा खेचर हे आध्यात्मिक गुरू म्हणून लाभले. ती महाराष्ट्रातील मराठी भाषेमधील जुन्या काळातील कवींपैकी एक होते. त्यांनी वज्र भाषांमध्येही काव्ये रचली. शिखांच गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाब पर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते.
नामदेवांनी केलेल्या साहित्यरचना
विष्णूभक्त प्रल्हादाचा अवतार असलेल्या शिरोमणी नामदेव महाराजांनी अनेक प्रकारच्या साहित्यरचना रचल्या नामदेवांनी शंभर कोटी अभंग लिहिण्याचा संकल्प केला होता. त्यांनी वज्र भाषेतही काव्य रचली भागवत धर्माचा प्रचार पूर्ण भारतात केला.
संत नामदेवाची अभंगाची गाथा प्रसिद्ध आहे. यामध्ये सुमारे 2500 अभंग लिहिले आहेत त्यांनी हिंदी भाषेत काही अभंग रचले आहेत. संत नामदेवांनी आधी, समाधी व तीर्थावली या गाथेतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्र्वरांचे चरित्र सांगितले आहे. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले, समाजजागृती केली.
संत ज्ञानेश्वरानंतर संत नामदेवांनी भागवत धर्माचा प्रचार केला. महाराष्ट्राची संस्कृती जपण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे. वय 80 असताना त्यांनी संजीवनी समाधी देण्याचा निर्णय घेतला. संत नामदेव हे आषाढ वैद्य त्रयोदशी, शके १२७२ मध्ये (शनिवारी, दि. ३ जुलै, १३५० रोजी) पंढरपुर येथे पांडुरंगचरणी विलीन झाले.
मित्रांनो जर तुम्हाला संत नामदेव महाराज मराठी निबंध | Sant Namdev Maharaj Essay in Marathi ही पोस्ट आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमंडळींमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद. अधिक माहितीसाठी भेट द्या.
हे नक्की वाचा
- संत ज्ञानेश्वर महाराज मराठी निबंध | Sant Dnyaneshwar Maharaj Essay in Marathi
- संत तुकाराम महाराज वर मराठी निबंध | Sant Tukaram Maharaj Information in Marathi
- [ Pdf ] समानार्थी शब्द मराठी 1000 | Samanarthi Shabd Marathi