संत तुकाराम महाराज वर मराठी निबंध | Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकाराम महाराज वर मराठी निबंध | Sant Tukaram Maharaj Information in Marathi | Sant Tukaram Essay in Marathi:

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे नाव ऐकले की डोळ्यासमोर येतो वारकरी संप्रदाय संत तुकाराम यांच्या गाथा त्यांनी लिहिलेले अभंग तसेच त्यांची पूर्ण जीवन जीवनशैली कशा प्रकारची होती ते आज आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहे.जर तुम्हाला संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल माहिती हवी असेल तर हि पोस्ट नक्की तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. चला तर मग पाहूया त्यांच्या जीवनातील संपूर्ण माहिती.

Sant Tukaram Maharaj Information in Marathi

संत तुकाराम महाराज वर मराठी निबंध | Sant Tukaram Maharaj Information in Marathi

वारकरी संप्रदायातील संत तुकाराम महाराज हे थोर संत होते. संत तुकारामांच आराध्य दैवत म्हणजेच पंढरीचा विठूराया त्यांची विठ्ठलावर जिवापाड भक्ती होती. संत तुकाराम यांचं पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबिले असे होते. त्यांचा जन्म माग शुद्ध 5 शके 1528 म्हणजेच 22 जानेवारी 1608 रोजी देहू या गावात झाला. त्यांचे आडनाव आणि त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासात वेगवेगळ्या नोंदी आहेत त्यांचे आडनाव (मोरे) हे असल्याचेही सांगितले आहे . वडिलांचे नाव बोल्होबा अंबिले आणि आईचे नाव कनकाई अंबिले असे होते. तुकाराम महाराजांना एकूण दोन भाऊ होते. एक मोठा भाऊ सावजी अंबिले तर एक छोटा भाऊ कान्होबा आंबिले.

संत तुकाराम महाराज यांचा विवाह पुण्याचे आप्पाजी गुळवे यांची कन्या जिजाई यांच्याशी झाला होता. त्यांना एकूण चार अपत्ये होती महादेव, विठोबा, नारायण आणि भागुबाई आणि एक लहान भाऊ त्याचा सांभाळ ही तुकाराम महाराज हेच करत होते. आई-वडील किशोरवयात असतानाच वारले. मोठा भाऊ सावजी अंबिले हे तीर्थयात्रेला निघून गेले यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी संत तुकाराम महाराज यांच्यावर पडली. त्यातच त्यांना भयंकर दुष्काळाचा सामना करावा लागला संतू नावाचा त्यांचा मोठा मुलगा दुष्काळातच गेला. गुरे ढोरेही गेली, महाजनकी बुडाली मन उदास झाले एवढे सगळे दुःख सोबत घेऊन त्यांनी विठ्ठलावरची आपली परमभक्ती कायम ठेवत देहू गावाजवळील भंडारा डोंगरावर उपासना चालू केली.

संत तुकारामांच्या घराण्यातील विश्वंभर बुवा हे मूळ पुरुष महान विठ्ठलभक्त होते. त्यांच्या घरात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. तुकारामांचा सावकारीचा परंपरागत व्यवसाय होता. परंतु दुष्काळ पडल्यामुळे त्यांनी सर्व कुळांना त्यांच्या सावकारीच्या पाशातून मुक्त केले.जमिनीची गहाणवटीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत टाकून दिली. पुढे प्रवचने कीर्तने करताना तुकारामांनी अभंगाची रचना सुरू केली.

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी प्रबोधन करण्यासाठी भक्तीचा मार्ग निवडला. तुकाराम महाराजांनी स्वतःच्या संसाराचा त्याग केला म्हणूनच ते म्हणतात .|बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणुनी| जगाचा संसार सुरळीत चालण्यासाठी अभंगाद्वारे समाजाला मार्गदर्शन केले. त्यांना गरिबांबद्दल कळवळत होती. समाजात समानता असावी, दारिद्रता नसावी असे त्यांचे मत होते. यामुळे त्यांनी त्यांच्याजवळील जमिनीची कागदपत्रे इंद्रायणी नदीत सोडून दिली गावातील लोकांना कर्जातून मुक्त केले. यामुळे काही कृतघ्न लोकांनी महाराजांना वेड ठरविण्याचा प्रयत्न केला. कटकारस्थाने केली पण तो विठूराया महाराजांच्या नेहमी मागे उभा असल्यामुळे त्यातून तुकाराम महाराज सहीसलामत सुटले.

संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट

छत्रपती शिवाजी महाराज सिंहगड आले होते. संत तुकाराम यांची ख्याती मग त्यांनी त्यांच्या राज्याच्या प्रधानाला बोलवले महाराज म्हणाले आपल्या राज्यात असा एक शुद्ध वैष्णव राहतोय आणि या संतांच्या कृपेने आपले राज्य सुरळीत चालू आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची अशी इच्छा होती की संत तुकाराम यांचा सत्कार करावा. महाराजांनी प्रधान सोबत सोन्याचे दागिने आणि घोडा हा संत तुकारामांच्या सत्कारासाठी म्हणून पाठवलं. शिवरायांचे सेवक भेटवस्तू घेऊन तुकाराम महाराजां जवळ आले आणि त्यांना सांगितले की हे सर्व शिवाजी महाराजांनी आपणास सत्कार म्हणून दिले आहे. पण तुकाराम महाराजांनी ते धन व त्या भेटवस्तू घेण्यास नकार दिला.

शिवाजी महाराजांना आनंद झाला. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांच्या भक्तीबद्दल ऐकून होते पण आज त्यांनी त्यांच्या वैराग वैराग्याचा अनुभव घेतला एवढ्या साऱ्या सगळ्या भेटवस्तू पाठवून देखील तुकाराम महाराजांनी त्या घेण्यास नकार दिला. शिवाजी महाराजांना तुकाराम महाराजांना पाहण्याची इच्छा आणखी वाढू लागली .एकेदिवशी छत्रपती शिवाजी महाराज संत तुकाराम महाराजांचे दर्शन सत्संग आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी देहू गावी आले होते. ईश्वरनिष्ठ महापुरुषाला पाहून ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या कृपेची याचना करू लागले.

परंतु तुकाराम महाराज यांनी शिवाजी महाराज यांना समर्थ रामदासस्वामींना शरण जाण्याचा उपदेश केला. संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शास्त्र म्हणजे काय हे सांगून राज धर्म समजावला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचे कीर्तन मार्गदर्शन यातून प्रेरणा घेतली.

संत तुकाराम महाराज स्वभावाने अगदी गरीब आणि शांत होते. तुकाराम महाराजांची भाषा अत्यंत स्पष्ट आणि वास्तव दर्शवणारी होती.संत तुकाराम म्हणतात आम्ही विष्णू दास मेना पेक्षाही मऊ आहोत. परंतु प्रसंगी इंद्राच्या वज्रला देखील भेदून जाऊ. एखाद्याला मदत करायचे ठरवले तर आम्ही लंगोटी काढून सुद्धा देऊ परंतु आमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर मात्र त्याला फटके द्यायला आम्ही मागेपुढे बघत नाही.

मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदूं ऐसे।
भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथी हाणू काठी।

हे नक्की वाचा:

Leave a Comment