निरोप समारंभ मराठी भाषण | Send Off Speech in Marathi

नमस्कार मित्रांनो, या लेखात आपण निरोप समारंभ मराठी भाषण | Send Off Speech in Marathi पाहणार आहोत. मित्रानो प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्याला आपल्या प्रिय सोबतीनां सोडून जावे लागते आणि बरयाचदा अश्या वेळी निरोप समारंभाचे आयोजन देखील केले जाते. पण खूप साऱ्या मित्राना प्रश्न पडतो कि निरोप समारंभ भाषण कसे द्यावे?  शाळा कॉलेजमधे देखील 10 वी निरोप समारंभ भाषण मराठी द्यावे लागते. आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत निरोप समारंभ भाषण मराठी तर चला सुरू करूया.. 

निरोप समारंभ मराठी भाषण | Send Off Speech in Marathi

सन्माननीय प्राचार्य, आदरणीय सर्व शिक्षक, माझे जिवलग मित्र आणि येथे उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो.

तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार. मित्रांनो आपण सर्वजण जाणतो की आज आपला शाळेचा शेवटचा दिवस आहे आज आपण एक छोटासा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार व्यक्त करतो आणि मला माझे मनोगत व्यक्त करण्याची परवानगी दयावी अशी मी आपणास विनंती करतो.

Send Off Speech in Marathi


मित्रांनो, आजचा दिवस हा अत्यंत भावूक दिवस आहे. हा दिवस केवळ माझ्यासाठीच नाही तर माझ्या मित्रांसाठी देखील अत्यंत भावूक दिवस आहे कारण आजपर्यंत आपला सर्वांचा मुक्काम एका ठिकाणी होता मात्र आज हा मुक्काम येथे संपला आहे. जो दिवस आपल्याला नको होता तो दिवस अखेर आला आहे. आजपर्यंत आपण अनुभवलेले सुखाचे क्षण, काही गोड-कडू आठवणी आणि आपले संपूर्ण शालेय जीवन भूतकाळा मधे सोबत घेऊन आजचा दिवस उभा आहे. उद्यापासून तुम्हा सर्वाचा प्रवास वेगवेगळा आहे हे छातीठोक पणे आपल्याला सांगत आहे.

गेली बारा वर्षे ज्या घरात आपण सर्वजण एकत्र राहिलो, एकत्र वाढलो, ज्ञान घेतले, जिवाभावाचे मित्र भेटले, आई-वडिलांचे प्रेम मिळाले अशा आपल्या हक्काच्या घरातून पाणावलेल्या डोब्बांनी आपणास मनात नसताना देखील बाहेर पडावे लागणार आहे. एक अनोळखी म्हणून या ज्ञानाच्या घरात प्रवेश केला मला आपलेसे म्हणणारे येथे कोणीही सताना देखील मी या शाळेमध्ये प्रवेश घेतला. या शाळेने मला आपलेसे करून घेतले आणि आई-वडिलांसारखे गुरु आणि भावंडांसारखे मित्र दिले. भलेही मला शिक्षकांनी शिक्षा केली असेल पण ती माझ्याकरिता शिक्षा नव्हती तर ती मला चूक सुधारण्यासाठी दिलेली संधी होती. अज्ञाना च्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जाण्याचा तो मार्ग होता. या शाळेने दिलेली भावंडे, माझे मित्र-मैत्रिणी यांचासोबत माझी जोडलेली नाळ न तूटणारी आहे. आम्ही खूप शाळेमध्ये मौजमजा, सकाळी तर बेंचवर बसण्यासाठी खूप भांडणे व्हायची पण नंतर मात्र सर्व व्यवस्थित असायच. ते बेंचला कान लावून वाजवणं, तासाला कोणी शिक्षक येण्यापूर्वी नकळत कागदाचे विमान उडवणे, शिक्षक शिकवताना बेंचवर उभं राहणं, सरांनी शिक्षा केल्यावर पुढे जावून अंगठे अशा कितीतरी आठवणी मला आठवतात. पण काय करणार? या केवळ आठवणीच्या रूपात सर्वांच्या मनात सदैव जिवंत राहणार आहेत.

ज्यावेळी पहिल्यांदा या शाळेत प्रवेश घेतला त्यावेळी मी स्वतः रडत रडत शाळेत आलो होतो कारण त्यावेळी माझं इथे कोणचं “नव्हतं पण आज मात्र मला खूप काही शाळेनं दिलं आणि शाळाच मला खूप रडवत आहे.आम्हाला माहित आहे की, आम्ही हे जीवन पुन्हा जगू शकणार नाही, इथे घालवलेले दिवस आम्ही कधीही विसरणार नाही. शेवटी, मी पुन्हा प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो आणि मी वचन देतो की आम्ही आपल्या भविष्यातील प्रत्येक असाइनमेंटमध्ये शिकलेले नीतिशास्त्र, कौशल्य आणि कौशल्ये नेहमी दर्शवू.

जाता जाता फक्त एवढच सांगू इच्छितो की यानंतर गरी आपल्या जीवनाचा प्रवास वेगळा असला तरी माझे शालेय जीवन आणि गोड आठवणी माझा देह असेपर्यंत सदैव माझ्या हृदयामध्ये जिवंत राहतील.या शाळेच्या चरणी माझा माथा टेकवून वंदन करतो व मला बोलण्याची संधी दिल्याबदल सर्वांचे आभार व्यक्त करतो.

Leave a Comment