शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध | Shetkaryachi Atmakatha Essay in Marathi

नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे NmkResut.com वेबसाईटवर .वरील विषयास अनुसरून प्रस्तुत लेख म्हणजेच शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध ( shetkaryachi atmakatha essay in marathi) विद्यालयीन /महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना हा विषय निबंध लेखनासाठी विचारला जातो.

निबंध लिहीत असताना शेतकरी कशा पद्धतीचे जीवन जगत आहे.याचा उल्लेख या लेखात झाला पाहिजे. चला तर मग पाहूया कसा लिहायचा हा मराठी निबंध लेख.

शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध | Shetkaryachi Atmakatha Essay in Marathi

माझं नाव हनुमंत पाटील मी छोटा शेतकरी .पश्चिम महाराष्ट्रातील एका आडगावात माझी थोडी जमीन आहे जमीन ही जिरायत स्वरूपाची आहे.जिरायत शेती हा व्यवसाय पावसावर मुख्यतः हवामानावर अवलंबून असलेला व्यवसाय आहे पाऊस कमी किंवा जास्त झाल्यास त्याचा परिणाम शेतीवर होतो.

Shetkaryachi Atmakatha Essay in Marathi

आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे आणि शेतकरी येथील राजा.परंतु आजची सध्या स्थिती पाहता शेतकरी असणे म्हणजे एक गुन्हा असल्यासारखे आहे .हे राजकारणी आणि व्यापारी शेतीसारख्या पारंपारिक व्यवसायाचा व्यापार बनू पाहत आहेत.शेती परवडत नाही यामागचे मुख्य कारण म्हणजेच व्यापारी आणि दलाल शेतमालाचा खूप कमी भाव देऊन लागणारे कष्ट आणि गुंतवले जाणारे पैसे नफ्यापेक्षा जास्त असतात त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती हा व्यवसाय परवडत नाही.

सरकार दर वेळेस काहीतरी योजना घेऊन तात्पुरता फायदा शेतकऱ्यांना मिळवून देते पण हे मधले सरकारचे दलाल ती योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचून देत नाही. यामुळे शेतकऱ्याला त्या योजनेचा लाभ घेता येत नाही . शेतकऱ्याला जर योग्य तो बाजार भाव मिळाला आणि निसर्गाने जर साथ दिली तर तर शंभर टक्के भारतातील शेतकरी आत्महत्या कमी होतील.

आर्थिक खर्च आणि मुलांची शिक्षणे इतर खर्च यामुळे बहुतेक शेतकरी रासायनिक शेतीचा पर्याय निवडतात यासाठी ते रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर करतात.यामुळे काही नाही, तर रासायनिक कंपन्या मोठ्या होत चालल्यात आणि शेतकरी मात्र गरीब होत चालला आहे.

बळीराजाची परिस्थिती सध्या च्या काळात खूप हालाकीची आहे आहे पण मी आशा करतो की नक्कीच हा काळ बदलेल आणि बळीराजाचे राज्य येईल.आणि भारताचा तरुण शेतीकडे पर्याय म्हणून नाही तर व्यवसाय म्हणून पाहिल.

तर मित्रांनो हा होता  शेतकऱ्याची आत्मकथा मराठी निबंध|(shetkaryachi atmakatha essay in marathi).मी अशा करतो कि तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा.आणि आम्हाला कमेंट कधी नक्की कळवा.

हे नक्की वाचा –

Leave a Comment