छत्रपती शिवाजी महाराज माहिती, निबंध व भाषण – Speech on Shivaji Maharaj in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज माहिती, निबंध व भाषण – Speech on Shivaji Maharaj in Marathi: नमस्कार मित्रानो स्वागत आहे तुम्ह्च एक माहितीपूर्ण पोस्ट मधे या पोस्ट मधे आम्ही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज बद्दल सर्व माहिती माहिती, निबंध व भाषण रूपी देणार आहे. तरी तुम्ही हि सर्व marathi essay on shivaji maharaj, shivaji maharaj information in marathi essay, speech on shivaji maharaj in marathi नक्की वाचा.

छत्रपती शिवाजी महाराज माहिती, निबंध व भाषण – Speech on Shivaji Maharaj in Marathi

साडेतीनशे वर्षाच्या गुलामगिरीच्या बंधनातून मुक्त करून हिंदवी स्वराज्यात सुख नि शांती ने जगण्याचा अधिकार छत्रपती शिवाजी महाराज यांनी अथक परिश्रम करून जनतेला दिला. अश्या या महान योध्याला नमन करून निबंध लिहायला सुरवात करूया.

marathi essay on shivaji maharaj
Speech on Shivaji Maharaj in Marathi

छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले (Chtrapati Shivajiraje Shahajiraje Bhosale ) : हे संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारताला आणि विश्वाला आदर्शवत असे राजे आहेत. त्यांच्या जीवनावर आधारित निबंध.

सुमारे साडेतीनशे वर्षाच्या प्रदीर्घ अंधाऱ्या, पारतंत्र्याने काळवंडलेल्या कालखंडानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जाणताशिवाज जनार्दनाने आपले तारणहार छत्रपती शिरायांना जनता राजा हा मनाचा खिताब बहाल केला.

महाराष्ट्र भूमीत शिवरायांनी अथक पराक्रमाने स्वराज्याची स्थापना केली. शिवरायांनी बादशहाच्या,सुलतानाच्या मगरमिठीतून , प्रजेला मुक्त केले. शिवरायांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. माता जिजाबाई आणि वडील शहाजीराजे यांनी त्यांची जडण – घडण केली.

सुसंस्कार शिक्षण , युध्हशाश्त्र , राजकारण न्यायशास्त्र , प्रजाहितदक्ष राज्यकारभार यात शिवराय तरबेज झाले. आणि एके दिवशी शिवरायांनी आपले सहकारी , मर्द मावळे यांच्या साहाय्याने महाराष्ट्रात स्वराज्याचे तोरण बांधले. हिंदवी स्वराज्याची स्थापना करून त्यांनी प्रजेला भयमुक्त केले.

स्वराज्य स्थापन झाले तरी स्वराज्याभोवती शत्रूचा सुळसुळाट होता. शत्रूचा बंदोबस्त करणे अगत्याचे होते. शिवराय राजकारण धुरंदर , दूरदृष्टीचे होते. अनेक गड किल्ले स्वराज्यात होते. अनेक शूर , लढवय्ये , पराक्रमी वीर स्वराज्याचा शत्रूचा बिमोड केला.शत्रूचा बिमोड झाल्यावर शिवरायांनी प्रजेच्या कल्याणकडे लक्ष दिले. प्रजेवर कोणत्याही प्रकारचा अन्यायहोऊ नये म्हणून शिवराय दक्ष होते. त्यांच्या राज्यात न्याय मिळत होता.

अपराध्यांना शासन होते होते. शेतकऱयांची गाऱ्हाणी दूर होतं होती.प्रजेच्या हिताच्या अनेक योजना शिवरायांनी सुरु केल्या होत्या. स्वराज्याचा विस्तार झाला होता. अशा प्रकारे शिवरायांनी प्रजाहितदक्ष राज्यकारभार करून खऱ्या अर्थाने बहुजन हिताय , बहुजन सुखाय याचा प्रत्यय आणून दिला.

त्यांचा राज्याभिषेक झाल्यावर ते छत्रपती झाले. स्वराज्यात जनता सुख समाधानाने नंदू लागली. अनेक अनेक मोहीमा काढून शिवरायांनी शत्रूला , नामोहरण केले. प्रजेवर अन्याय होऊ नये , त्यांच्या तक्रारींचे निवारण लगेच वाहावे , राज्यकारभार शिस्तीने चालावा यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमले.

प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटले. ते खरे तर आधुनिक लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रणेतेच होते. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसवून प्रजेचे सर्व मनोरथ त्यांनी पूर्ण केले.अखंड परिश्रम , दगदग यांचा त्यांच्या प्रकृतीवर परीणाम होते होताच. तरीही त्याची तम न बाळगता ते शेवटपर्यंत कार्यरत होते. अखेर इ. स. १६८० मध्ये स्वर्गारोहण केले.

प्रा नरहर कुरंदकर यांच्या मते प्राचीन काळापासून जे जे श्रेष्ठ राजे भारतवर्षात होऊन गेले त्या राज्यांच्या सर्वांमध्ये श्री शिवाजी महाराज एक आगळे वेगळे होते. अरं त्या राज्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे राज्य नष्ट झाले. परंतु शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्य्नाच्या राज्याच्या रक्षणासाठी मराठे लढले. त्यांनी राज्याचे रक्षण केले.

प्रतिकूल राजकीय परिस्थितीत कोणीही नेता नसताना मराठी फौज लढत राहिली. कारण त्यांना ते शिवाजी महाराजांचे राज्य असे कधीच वाटले नाही. त्यांनी ते राज्य स्वतःचे मानले. अशी घटनाच देशाच्या इतिहासात अनोखी व एकमेव होती.लढायांमागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही. एका सामान्य जहागीरदाराच्या मुलाने मोगल बादशहाला आव्हान देणे म्हणजे सामान्य बाब नव्हे

स्वतःच्या हिमतीवर समोर कोणी मार्गदर्शक नसताना मध्ययुगीन भारतात नवीन रास्ता बांधून दाखवणारे ते कल्पक पुरुष होते. स्वराज्य स्थपन करताना जीवाला जीव देणारे साठी – सोबती त्यांनी निर्माण केले. स्वराज्य स्थापन करताना त्यांच्यापूढे कठीण अडचणी आल्या. संकटाचे महापूर आले. परंतु ते हरहुनर्री , निधड्या , छातीचे , गंभीर योजक प्रसंगावधानी लोकनायक होते. त्यामुळे अफजलखानाची भेट असो , कि शाहिस्तेखानावर छापा असो , किंवा आग्र्याची नजरकैद असो ते सर्व प्रसंगातून सहीसलामत सुटले.

शिवाजी महाराज्यांच्या राज्य स्वतःचे राज्य नव्हते. प्रजेचे राज्य होते. ते राज्याचे उपभोगशून्य स्वामी होते. श्रीमान योगी होते. आपले शौर्य विसरून गेलेल्या किंवा पायाखाली तुडविल्या गेलेल्या व आत्मविश्वास गमावून बसलेल्या , मृतप्राय समाजाला शुद्धीवर आणायचे. राज्यकर्त्यांकडून दंड थोपटून राहण्याचे सामर्थ्य त्यांनी निर्माण केले.

हे नक्की वाचा :

Leave a Comment