तर मित्रांनो स्वागत आहे तुमच आमच्या वेबसाईटवर आम्ही तुम्हाला व्यायामाचे फायदे मराठी निबंध|vyamache fayade eassy in marathi बद्दल माहिती देणार आहे.शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत असताना बर्याच वेळा हा निबंध विचारला जातो.जर तुम्ही महाविद्यालयात शिकत असाल आणि व्यायाम करणे तुम्हाला आवडत असेल तर हि पोस्ट तुम्हाला नक्की फायदेशीर ठरेल.
व्यायामाचे फायदे मराठी निबंध | vyamache fayade eassy in marathi
आजचे युग हे डिजिटल युग आहे. आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती साधे सोपे काम करण्यासाठी सुद्धा यंत्राचा वापर करतो. तंत्रज्ञानामुळे सर्व गोष्टी अगदी काही क्षणात यंत्राच्या साह्याने मनुष्य करू लागला आहे.पण यामुळे माणूस प्रत्येक कामासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रावर अवलंबून राहिला आहे.याचा परिणाम मानवी शरीरावर होऊ लागला आहे. सर्व गोष्टी अगदी सोप्या झाल्यामुळे मनुष्य आळशी होत चालला आहे. याच मुळे प्रतिकारक शक्ती मनुष्य शरीरातील कमी झाली आहे. यामुळे नवनवीन प्रकारच्या रोगांच्या नियंत्रणासाठी अनेक डॉक्टर आता व्यायामाचा सल्ला देतात.
व्यायाम म्हणजे काय
व्यायाम म्हणजे कायतर शरीराची चालना व बल वाढवण्यासाठी केलेली क्रिया म्हणजे व्याया होय.व्यायामाचे खूप प्रकार आहेत. पण कोण किती व्यायाम करतो ह्यापेक्षा किती नियमित पणे करतो हे अधिक महत्त्वाचे आहे. व्यायामामुळे शारीरिक कष्ट करण्याची मानवी क्षमता वाढते. शरीराला,मनाला,डोक्याला चालना मिळते कमीतकमी दररोज 25 ते 30 मिनिटे व्यायाम केला पाहिजे.

व्यायामामुळे शरीर मानसिक स्थिती निरोगी आणि सुदृढ बनते.स्नायू मजबूत होतात, हृदयाची कार्यक्षमता वाढते, शारीरिक रोगप्रतिकारक शक्ती वाढते, झोप व्यवस्थित लागते, भरपूर भूक लागते त्यामुळे निरोगी आयुष्य जगण्यास मदत होते.गरजेचे आहे आजच्या काळात व्यायाम करण्यासाठी व्यायाम शाळेत जाणे असे नाही तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची खेळ खेळू शकता अगदी सकाळी वीस मिनिटे चालला तरी शरीराचा भरपूर व्यायाम होतो. चालल्यामुळे रक्तदाब कमी होतो, गुडघ्याची हालचाल नीट राहते, डोळ्यांना कमी ताण होतो.
योगासन करणे हा खूप चांगला व्यायाम आहे.योगा शब्द स्वताच एक संपूर्ण विज्ञान आहे जो शरीर मन आत्मा आणि विश्वाला एकत्र करतो.योगामुळे शारीरिक अवयवांवर नियंत्रण राहते.योगाचे विविध प्रकार आहेत.शक्ती योग,पुनर्संचयित योग,अष्टांग योग,विन्यास योग,कुंडलिनी योग 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो.अर्थात “आरोग्यम धनसंपदा” आरोग्य खरं आहे. आरोग्य चांगला असेल तर माणूस काम करू शकतो जर आपण आजारी असलो तर काम करता येत नाही. चांगले आरोग्य माणसाची खरी संपत्ती आहे व्यायामाने माणूस बलवान व चपळ होतो.
तर मित्रांनो हा होता .मी अशा करतो कि व्यायामाचे फायदे मराठी निबंध|vyamache fayade eassy in marathi तुम्हाला हा निबंध आवडला असेल जर तुम्हाला हा निबंध आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत नक्की share करा.आणि आम्हाला कमेंट कधी नक्की कळवा.